प्रतिनिधी /शिराढोण
शिराढोण ता कळंब येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय प्रशालेतील विद्यार्थी वल्लभ शरद माडजे आणि गोपाळ दिगंबर पांचाळ यांनी भारतीय रिझर्व्ह बँक अखिल भारतीय वित्तीय साक्षरता सामान्यज्ञान स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेसाठी उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान या विद्यार्थ्यांना मिळाला. याचबरोबर दहा हजार रुपये शिष्यवृत्ती ही मिळवली. भारतीय रिझर्व बँक लीड मॅनेजर राहुल कुमार,भारतीय स्टेट बँक रिजनल मॅनेजर उस्मानाबाद नरसिंग कुमार मेहता, डायट प्राचार्य उस्मानाबाद जटनुरे सर, एसबीआय सीनियर असोसिएट राहुल जोशी, लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर सचिन ससाने, एसबीआय चीफ मॅनेजर उस्मानाबाद प्रवीण डोंगरे जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी काझी सर यांच्या वतीने या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन जाधव, सहाशिक्षक दत्तात्रय राठोड यांच्या सह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.