प्रतिनिधी / शिराढोण
शिराढोण (ता. कळंब) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान अंतर्गत शेतकरी मेळावा छत्रपती सभांजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आला होता.अभियानात शेतकऱ्यांना वारंवार भेडसावणाऱ्या प्रश्नासंदर्भात आढावा घेण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांना होणाऱ्या रान डुकरांच्या त्रासापासुन वाचवणे व शेतीसाठी 100 % अनुदानावर कुंपन तार देणे, उसाची एफआरपी वेळेवर देणे, सोयाबीनला ७००० रुपये दर मिळावा, शेतकऱ्यांचे शेतातील थकीत वीजबील माफ करावे, स्वामीनाथन आयोग जसाच्या तसा लागू करावा, पिक विमा तत्काळ द्यावा, शेतकऱ्यांना योग्य हमी भाव द्यावा, यासह विविध शेतकरी प्रश्नावर संघटनेच्या नेत्यांनी आपली मते मांडली. यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय जाधव,जिल्हा अध्यक्ष रविंद्र इंगळे, माजी पं. स.सदस्य राजेश्वर पाटील, युवा जिल्हाध्यक्ष विष्णु काळे, ऍड,नितीन पाटील, कमलाकर पवार, पंकेश पाटील, चंद्रकांत समुद्रे, धर्मराज पाटील, बालाजी शिंदे,माउली कणसे, निलेश नाईकवाडे, बडे शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.