औरंगजेब कधीच आदर्श होऊ शकत नाही -गृहमंत्री फडणवीस
विशेष प्रतिनिधी / मुंबई
आक्रमक असणारा औरंगजेब हा या देशातील कुणाचाही नेता किंवा आदर्श होऊ शकत नाही,तो मंगोल वंशीय होता,मुस्लिमांचा पण तो नेता होऊ शकत नाही. छत्रपती शिवराय, महाराणा प्रताप,अब्दुल कलाम हे आपले आदर्श असू शकतात. त्यामुळे बाबासाहेबांचे नातू ऍड,बाळासाहेब आंबेडकर यांनीही त्याचे महिमा मंडन करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी आज विधानसभेत केले.
भाजपचे आमदार नितेश राणे nitesh rane यांनी औरंगजेब यांची होणारी प्रशंसा,ठेवले जाणारे स्टेटस आणि काही मुस्लिम तरुणांनी झलकवलेले औरंगजेबाची पोस्टर्स यावर तातडीने कारवाई व्हावी, अशी लक्षवेधी मांडून मागणी केली.
यादरम्यान राणे आणि सपाचे अबू आझमी Abu azami यांच्यात शाब्दिक चकमक झाली. तुम्हाला औरंग्याचे एवढे प्रेम असेल तर इथे कशाला राहता, निघून जा पाकिस्तानात, असा शेरा मारल्याने सभागृहात काहीवेळ गोंधळ झाला.
सरकारने केली संभाजी भिडेंची पाठराखण
मुंबई – संभाजी भिडे sambhaji bhide यांनी अमरावतीमधील जाहीर सभेत महात्मा गांधी यांच्याबाबत जे वक्तव्य केले ते तपासले जाईल,।महापुरुष कोणतेही असो, हे सहन केले जाणार नाही,जशी भिडे गुरुजी यांच्यावर कारवाई केली जाईल तशीच सावरकर यांच्या अपमानप्रकरणी काँग्रेसचे मुखपत्र शिदोरी मासिकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस नेते नाना पटोले nana patole,पृथ्वीराज चव्हाण,विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती मात्र अध्यक्षांनी ती नाकारल्याने विरोधक आक्रमक झाले.विरोधी पक्षांच्या आक्षेपांना उत्तर देताना फडणवीस यांनी भिडे यांचा उल्लेख भिडे गुरुजी असा केल्याने त्याला आक्षेप घेण्यात आला.त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की भिडे गुरुजी हे हिंदुत्व प्रसार कार्य करतात आणि बहुजन समाजाला शिवरायांच्या गड किल्ल्यांशी जोडतात हे कार्य चांगले आहे, असे सांगत भिडे यांचे समर्थन केले.
भिडे यांनी ज्या काँग्रेसी लोकांची पुस्तके वाचून दाखवली त्याची माहिती घेतली जाईल,अमरावती सभेचे चित्रण उपलब्ध झाले नाही,भिडेना नोटीस बजावली आहे .असे सांगून हा स्थगन प्रस्ताव काँग्रेस नेत्यावर उलटवली, सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी शिदोरी मासिकावर गुन्हे दाखल करण्याची घोषणा केली. त्याच्या निषेधार्थ विरोधकांनी सभात्याग केला.