धाराशिव ते कन्याकुमारी 1360 किलोमीटर सायकल प्रवास
प्रतिनिधी / धाराशिव
रोटरी क्लब ऑफ धाराशिव व हाफ मॅरेथॉन यांच्या संयुक्त विद्यमाने 17 तरुणांनी उस्मानाबाद ते कन्याकुमारी असा 1360 कि.मी. सायकल प्रवास पुर्ण करुन नवा इतिहास रचला आहे. त्यात रोटरी क्लब उस्मानाबादच्या 12 सदस्यांचा सहभाग होता. 8 ते 11 ऑगस्ट हा या प्रवासाचा कालावधी होता. या प्रवासात त्यांनी ठिकठिकाणच्या रोटरी क्लबला भेटी दिल्या.या सर्वात मोठ्या मोहीमेबद्दल रोटरी क्लबच्या
वतीने जे.एफ. अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालयात या सर्व सायकल वीरांचा मानचिन्ह व शाल देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणुन आयर्नमॅन शाम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. हाफ मॅरेथॉनचे गिरीश अष्टगी, रोटरी क्लबच्या अध्यक्षा रो. डॉ. अनार साळुंके, सचिव रो. डॉ. मिना जिंतुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रस्ताविक डॉ. अनार साळुंके यांनी केले तर प्रमुख पाहुणे शाम शिंदे यांची ओळख रवीकांत शितोळे यांनी करुन दिली. याप्रसंगी सायकलवीर रो. रणजित रणदिवे, रो. सुरज कदम व प्रदिप खामकर तसेच रुपाली रणजित रणदिवे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी प्रांतपाल व क्लब ट्रेनर रो. रवींद्र साळुंके यांनी समारोप केला. सचिव रो. डॉ. मिना जिंतूरकर यांनी सूत्रसंचालन तसेच आभार सुत्रसंचालन मानले.