प्रतिनिधी / अणदूर
येथील जयमल्हार पत्रकार संघाच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अणदूरच्या 9 सुपुत्रांचा अणदूर रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ रविवार, 14 जानेवारी सकाळी 11 वाजता हुतात्मा स्मारक सभागृहात मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला असून,सदरील कार्यक्रमास अणदूर परिसरातील नागरिक बंधू भगिनींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जयमल्हार पत्रकार संघाचे प्रमुख पत्रकार अजय अणदूरकर यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अणदूरचे सरपंच रामचंद्र आलूरे, उपसरपंच डॉ नागनाथ कुंभार, श्री श्री गुरुकुलचे संस्थापक डॉ जितेंद्र कानडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत,सदरील कार्यक्रमात अणदूरचे भूषण असणारे भारत सरकारच्या केंद्रीय भटके विमुक्त विकास आणि कल्याण बोर्ड सदस्य प्रवीण घुगे(राजकीय),प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ नितीन ढेपे(वैद्यकीय),लोहारा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी(प्रशासकीय), डायट प्राचार्य इब्राहिम नदाफ(शैक्षणिक), मोहोळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे(ग्रहविभाग),प्रसिद्ध औषध विभाग शास्त्रज्ञ जयप्रकाश संगशेट्टी(वैज्ञानिक),कोपरगाव येथील वरिष्ठ पत्रकार शंकर दुपारगुडे (पत्रकारिता),स्टेट बँक शाखा धाराशिवचे शाखाधिकारी विजयकुमार कांबळे(बँकिंग), सामाजिक कार्यकर्त्या बाबई चव्हाण (सामाजिक)आदी विविध क्षेत्रात मोलाचे कार्य करून अणदूर गावाचे नाव गाजविणाऱ्या व्यक्तींचा अणदूर रत्न म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. सदरील कार्यक्रमात अयोध्या राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमंत्रित मधुकर घुगे यांचा सन्मान करण्यात येणार असून तसेच जयमल्हार पत्रकार संघाच्या 2024 दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सदरील कार्यक्रमास अणदूर मधील नागरिक बंधू भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन जयमल्हार पत्रकार संघ अणदूर यांनी केले आहे