प्रतिनिधी / धाराशिव
अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस वीस वर्ष सक्त मजुरी व ५०,००० रुपये दंडाची शिक्षा धाराशिव येथील अतिरिक्त सहजिल्हा न्यायाधीश एस.डी. जगताप यांनी सुनावली.
सदर प्रकरणाची विशेष शासकीय अभियोक्ता सचिन एस. सुर्यवंशी यांनी सांगीतलेली हकीकत अशी की, ४ फेब्रुवारी २०२१ रोजी सदर प्रकरणातील पिडीत मुलीच्या आईने शासकीय रुग्णालय अंबाजोगाई येथे त्यांची मुलगी ऍडमीट असताना फिर्याद दिली की, मागील ६ महिन्यापासुन ते कळंब तालुक्यातील एका गावात विहीरीच्या कामानिमित्त मजुरीने फिर्यादी व तिची अल्पवयीन मुलगी व परिवार उपजिवीकेसाठी वास्तव्यास होते. दरम्यानच्या काळामध्ये एक शेतक-याच्या शेतामध्ये सालगडी म्हणुन काम करणारा सिध्दार्थ लक्ष्मण खंदारे (रा. उमराव देशमुख ता. मेहकल, जि. बुलढाणा) हा त्यांच्या घरी नेहमी येत जात असे. त्याने त्याच्या ओळखीचा गैरफायदा घेवुन फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीसोबत वारंवार शारिरीक संबंध केले व त्यामुळे सदर मुलगी गर्भवती झाली.त्यावरून सिध्दार्थ लक्ष्मण खंदारे विरुध्द तक्रार दिली.
फिर्यादीवरून पोलीस स्टेशन कळंब येथे गु.र.नं. ५४ / २०२१ नुसार भादंविचे कलम ३७६ (२) (जे) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम चे कलम ४ नुसार आरोपी सिध्दार्थ लक्ष्मण खंदारे विरुद्ध गुन्हा नोंद झाला. प्रकरणाचा तपास पी.एस.आय. गुर्सींगे यांनी करून तपासाअंती आरोपी विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश एस.डी.जगताप यांच्या न्यायालयासमोर झाली.प्रकरणात अभियोक्ता सचिन एस. सुर्यवंशी यांनी काम पाहिले. सदर प्रकरण प्रलंबित असताना कळंब येथे अति. जिल्हा व सत्र न्यायालय न्यायालयात वर्ग झाले, त्यानंतर सदर प्रकरणात अति. शासकीय अभियोक्ता अशिष एस. कुलकर्णी व पोलीस अंमलदार बी.पी. शिंदे ब.नं. ९० यांनी काम पाहिले. यांनी काम पाहिले. सदर प्