जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली कळंबमध्ये आंदोलन
प्रतिनिधी / कळंब
जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, दुधाला भाववाढ द्यावी आदी मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या पवार गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संपूर्ण जिल्हा दुष्काळ जाहीर करण्यात यावा, दुध दरवाढ करावी, शेतीची वीज समस्या मिटविण्यात यावी, पिक विमा रक्कम तत्काळ मिळावी, साखर कारखान्याचे वजन काटे डिजिटल करावेत यासह विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आहेत आंदोलकांच्या मागण्या
संपूर्ण जिल्ह्यात तीव्र दुष्काळ जाहीर करुन संपूर्ण पीक कर्ज माफ करावे, शेतमजूरांना कामे, नाला खोलीकरण, तलावातील गाळ काढणे, विहीरी पाडणे, पाण्याची व्यवस्था करणे व जनावरांसाठी चारा छावण्या उघडण्यात याव्यात, गाईच्या दुधाला ४० रुपये तर म्हशीच्या दुधाला ७० रुपये भाव देवून शेतीपूरक व्यवसाय वाचवावा, २०२२ चा राहीलेल्या पीक विम्याचे ३०० कोटी रुपये मिळावेत, तसेच २०२३ च्या राहीलेल्या ९० हजार शेतकऱ्यांना अग्रीम देवून संपूर्ण पीक विमा व सततच्या पावसाचे राहीलेले अनुदान त्वरीत वाटप करावे. साखर कारखान्यानी ऊस वजनकाटे डिजीटल करुन दर्शनी भागामध्ये स्क्रिनवर लावावे व चालु वजन काट्याची भरारी पथकामार्फत तपाणी करण्यात यावी, ऊसाला एफ.आर.पी.प्रमाणे दर द्यावा, जिल्ह्यातील नगर परिषद क्षेत्रातील स्वच्छता व पाणी नियोजनाजा बोजवारा उडाला असून, यावर तत्काळ कारवाई करावी.तसेच टेंभूर्णी लातूर-महार्गावर साईट पट्ट्या नसल्यामुळे मागील एक वर्षात जवळपास ३० ते ४० निरापराध व्यक्तींचा मृत्यू झाला असून टेंभूर्णी लातूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम त्वरीत चालु करावे. येडेश्वरी मंदीर ते बार्शी अंबाजोगाई रस्त्यापर्यंत डांबरीकरण करुन ग्रामीण भागातील रस्ते त्वरीत दुरुस्त करण्यात यावेत. प्लास्टीक फुलावर बंदी घालण्यात यावी, जिल्हा परिषद व पंचायत समितीला मिळणाऱ्या वित्त आयोगाचे १८० कोटी रुपये त्वरीत द्यावेत, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षात चिलवडी, आळणी, गौर यासारख्या स्मारकांना निधी त्वरीत देवून स्मारक उभा करावेत आदी मागण्या यावेळी आंदोलनात करण्यात आल्या.या आंदोलनात ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर, संजय कांबळे, मुसद्दीक काझी, सुरेश टेकाळे, मनोहर हरकर, आबासाहेब आडसुळ, रमेश देशमुख, औदुंबर धोंगडे, तुषार वाघमारे, रणजित वरपे, अॅड. प्रविण शिंदे, विठ्ठल माने, भारत शिंदे, सागर चिंचकर, अरुण पवार, बाळासाहेब कथले, डॉ. जोगदंड, नारायण शिंदे, भाऊसाहेब शिंदे, प्रकाश मुंदडा, भाऊसाहेब पाटील, सिध्देश्वर घोगरे, नासेर शेख, किशोर आवाड, बबन काळदाते, सुनंदा भोसले, शोभाताई मस्के, सौदागरताई, आत्माराम बिक्कड, आर. डी. कोकाटे, महंमद चाऊस, पालकर, पांडुरंग जाधव, श्री. गाढवे, लालासाहेब थोरवे, भरत गरड, सत्तार मनियार, परमेश्वर यवले, संभाजी नहाने, हनुमंत जाधव, बाळासाहेब कदम, काकाजी महाडीक, समाधान भराटे, नामदेव माळकर, बापूराव पवार, विशाल डोंगरे, मनेश पाटील, दत्तात्रय पाटील, महेश शिंदे, बबन आडसुळ, सतीश पाटील, विशाल खराटे, संदिपान जाधव, किरण खोसे, जनक धोंगडे, संभाजी धोंगडे, प्रदिप आवाड, सतीश शितोळे, माणिक जाधव, सलमान खाँन पठाण, संतोष थोरवे, जगदिश जोशी, शरद सरवदे, लालासाहेब शितोळे, मोहन लोमटे, गणेश गडकर, संजय नवले, किसन शिनगारे, नितीन तवले, मदन पवार, काकासाहेब आडसूळ, रणजित कोल्हे, श्यामसुंदर पाटील, राहुल धाबेकर, गणेश धाबेकर, विठ्ठल कोकाटे, समाधान गाडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.