• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, April 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

येरमाळा येडेश्वरी यात्रेत मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 4, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
436
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / येरमाळा

येडेश्वरी यात्रेदरम्यान महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करून तिघांना अटक केली आहे. यात्रेतील गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या या टोळीला पोलिसांनी तत्परतेने जेरबंद केले. पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार (स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव) यांच्या आदेशानुसार यात्रेतील गर्दीच्या ठिकाणी चोरीसारखे गुन्हे घडू नयेत यासाठी पथकाकडून पायी गस्त घालण्यात येत होती.

यावेळी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आमराई परिसरातील मंदिराजवळ दोन महिला व एक पुरुष संशयास्पदरीत्या फिरत असून ते चोरीच्या उद्देशाने गर्दीत वावरत आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन संशयितांवर पाळत ठेवली. काही वेळ निरीक्षण केल्यानंतर ते गर्दीत चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत येरमाळा पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. चौकशीत आरोपींनी आपली नावे अनिल शेषेराव शिंदे (वय 34), सुनिता अनिल शिंदे (वय 29) आणि हिराबाई रमेश शिंदे (वय 40, सर्व रा. इंदिरानगर पाथरी, ता. पाथरी, जि. परभणी) अशी सांगितली. त्यांच्या वर्तनावर संशय आल्याने पंचासमक्ष अंगझडती घेतली असता अनिल शिंदे याच्या पँटच्या खिशातून चार वेगवेगळे सोन्याचे मनी मंगळसूत्र आढळून आले.

याबाबत विचारणा केली असता आरोपींनी कबुली दिली की, सकाळी 7 ते 9 वाजण्याच्या दरम्यान येरमाळा-बीड महामार्गावरील पुलाजवळ भाविकांसाठी करण्यात आलेल्या अंघोळीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून ते अनिल शिंदे याच्याकडे जमा केले जात होते. सदर कारवाईत एकूण 1 लाख 31 हजार रुपयांच्या किंमतीचे चार सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महिला पोलीस शोभा बांगर, महेबूब अरब, रोहित दंडनाईक या पथकाने पार पाडली.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #Gang#YermalaYedeshwariYatra
SendShareTweet
Previous Post

शिक्षकाची विद्यार्थ्याला काठीने अमानुष मारहाण; शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

Next Post

तुळजापूर शहरात अनधिकृत बॅनरचा सुळसुळाट; शहराचे विद्रूपीकरण, अपघाताचा धोका वाढला

Related Posts

सैन्य दलात २८ वर्षे सेवा; सुभेदार डोंगरे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक

April 11, 2026

मॉर्फ फोटोमुळे धाराशिवमध्ये राजकीय संभ्रम; पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा उधाण

April 11, 2026

आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्याला यश; अपर विभागीय आयुक्त कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

April 10, 2026

काँग्रेसमध्ये संघटन मजबुतीकरणाचा बिगुल; जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चेला वेग, तरुण चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता

April 10, 2026

‘या’ कारणामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना वर्षभर ब्रेक

April 10, 2026

मे महिन्यात तुळजाभवानी मंदिर विकास कामांचे होणार भूमिपूजन; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

April 9, 2026
Next Post

तुळजापूर शहरात अनधिकृत बॅनरचा सुळसुळाट; शहराचे विद्रूपीकरण, अपघाताचा धोका वाढला

2020 च्या पीक विमा प्रकरणात लोकप्रतिनिधी गप्प का? 134 कोटी रुपये कोणी अडवले?

ताज्या घडामोडी

सैन्य दलात २८ वर्षे सेवा; सुभेदार डोंगरे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक

April 11, 2026

मॉर्फ फोटोमुळे धाराशिवमध्ये राजकीय संभ्रम; पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा उधाण

April 11, 2026

आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्याला यश; अपर विभागीय आयुक्त कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

April 10, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group