प्रतिनिधी / धाराशिव
जिल्हा
परिषद
नाशिक
यांच्यातर्फे
शिक्षक
दिनाच्या
निमित्ताने
दरवर्षी
देण्यात
येणारा
जिल्हा
परिषद
गुणवंत
शिक्षक
पुरस्कार
येवला
तालुक्यातून
बालाजी
नाईकवाडी
यांना
जाही
र करण्यात
आला
आहे.या
पुरस्काराचे
वितरण
(दि
.९
) शनिवा
री नाशिकच्या रावसाहेब
थोरात
सभागृ
हात होणार
आहे.
नाशिक
जिल्हा
परिषद
अंतर्गत
भविष्यवेधी
शिक्षण,नाविन्यपूर्ण
उपक्रम
तसेच
मॉडेल
स्कूलच्या
माध्यमातून
विद्यार्थ्यांची
प्रगती
करण्यासाठी
प्रयत्न
केले
जात
आहेत.
नाईकवाडी यांची पूर्वीची
शाळा
राजापूर
ही
मॉडेल
स्कूल
व
उपक्रमशील
शाळा
म्हणून
ओळखली
जात
होती.त्याचप्रमाणे
पांडववाडी
शाळा
आयएसओ
नामांकन
मिळालेले
आहे.नाईकवाडी
हे
२००५
पासून
नाशिक
जिल्ह्यामध्ये
सेवा
करत
आहेत.त्यांनी
आतापर्यंत
केलेल्या
अठरा
वर्षाच्या
कार्यकाळामध्ये
शाळेसाठी
व
विद्यार्थ्यांसाठी
अनेक
नाविन्यपूर्ण
उपक्रम
राबवलेले
आहेत.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी फिरते वाचनालय, लेक वाचवा लेक शिकवा,सेल्फी विथ सक्सेस, स्टार ऑफ द विक, दत्तक मुलगी घेणे,शाळाबाह्य मुलांना सहकार्य करणे, मुलांच्या आरोग्यासाठी वॉटर बेल सुरू केली, दप्तर मुक्त शाळा अशासारखे अनेक उपक्रम शाळेमध्ये राबवले. तसेच सरकारी योजना विद्यार्थ्यापर्यंत पोचवणे हे कार्य खूप आवडीने केलेले आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी व विद्यार्थी प्रगत व्हावा हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले होते. खेड्यातील मुले इंग्रजी व गणित या विषयात कसे अग्रेसर राहतील यासाठी शाळेमध्ये छोटे छोटे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले होते.शाळा ज्ञानरचनावादी, तालुक्यातील पहिली तंबाखू मुक्त शाळा, स्वच्छ शाळा सुंदर शाळा, पट वाढवणारी शाळा,डिजिटल शाळा,त्याचप्रमाणे डिजिटल बॅनर युक्त शाळा, वृक्षारोपणामध्ये अग्रेसर शाळा, युनेस्को क्लब सभासद मिळवणारी पहिली शाळा, तर मुक्त शाळा करण्यासाठी सरांनी इतर सहकार्याच्या मदतीने प्रयत्न केले होते.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले होते. त्याचप्रमाणे कोरोना काळातील राज्यस्तरीय शिकू आनंदे व बालभारती येथील वर्चुअल क्लासरूम यामध्ये सरांनी विद्यार्थ्यांसह सहभाग नोंदवला होता. अनेक राज्यस्तरीय जिल्हास्तरीय प्रशिक्षणामध्ये त्यांनी सुभलक म्हणून कार्य केलेले आहे. स्वतःच्या यूट्यूब माध्यमातून जवळपास ९० शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती केलेली आहे. ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी टेस्ट, बाल संस्कारच्या माध्यमातून हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेतलेल्या आहेत.
मला मिळालेला हा पुरस्कार मी माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व माझ्या आईला व कुटुंबातील सदस्यांना अर्पण करत आहे असे त्यांनी सांगितले.
गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल समस्थ ग्रामस्थ कौडगाव यांच्या वतिन सरांचे खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.