• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, April 28, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

जिल्हा काँग्रेसला विश्वासात न घेता अशोक जगदाळेंचा काँग्रेस प्रवेश ?

Aarambha Marathi by Aarambha Marathi
November 13, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
367
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

कधी वंचित,कधी राष्ट्रवादी तर कधी काँग्रेस.. सूत कसे जुळणार

आरंभ मराठी / धाराशिव

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडून अशोक जगदाळे यांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र त्यांच्या या प्रवेश सोहळ्याला जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकारी गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना डावलून झालेल्या या प्रवेशामुळे, जगदाळेंचा पक्षप्रवेश स्थानिक स्तरावर टिकेल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जगदाळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांशी कोणतीही चर्चा केली नाही. त्यांनी थेट वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून प्रवेशाचा मार्ग निवडला. त्यामुळे काँग्रेसमध्येही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच गटबाजी आणि अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागणार, हे स्पष्ट होत आहे.

अशोक जगदाळे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तुळजापूर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अंतर्गत वादाचा सामना करावा लागला.
आता २०२९ ची विधानसभा लक्षात घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करून जगदाळे यांनी नवीन राजकीय समीकरणांची चाचपणी सुरू केली असली, तरी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत नसलेला समन्वय त्यांच्यासाठी मोठी अडचण ठरणार आहे.

जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये सध्या गटबाजी तीव्र असून, नव्याने आलेल्या जगदाळेंना स्वीकारणे अनेकांसाठी अवघड ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगदाळेंच्या काँग्रेसमधील भवितव्याबद्दलच नव्हे तर त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेबाबतही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कधी वंचित बहुजन आघाडी,कधी राष्ट्रवादी काँग्रेस तर कधी काँग्रेस पक्ष,असा सातत्याने पक्ष बदलाचा त्यांचा मार्ग त्यांना राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी उचित ठरेल का हे येणारा काळच सांगणार आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#ashokjagdale#entry#congress#district#confidence#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

विद्याचरण कडावकर यांची धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती

Next Post

अंघोळ करतानाचे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार

Related Posts

पाच तोळे सोन्यासाठी छळ; विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

April 28, 2026

अल्पवयीन मुलीवर दोघांकडून लैंगिक अत्याचार

April 27, 2026

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून 20 लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

April 27, 2026

माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळीच्या चोवीस तासात मुसक्या आवळल्या

April 26, 2026

बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या लॉजवर धाड; पोलिसांची मोठी कारवाई

April 25, 2026

अल्पवयीन बालिकेचा विवाह उधळला; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

April 22, 2026
Next Post

अंघोळ करतानाचे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार

शिवसेना उबाठा गटात इच्छुकांची गर्दी; रात्री दोनपर्यंत 150 जणांच्या मुलाखती,

ताज्या घडामोडी

पाच तोळे सोन्यासाठी छळ; विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

April 28, 2026

अल्पवयीन मुलीवर दोघांकडून लैंगिक अत्याचार

April 27, 2026

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून 20 लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

April 27, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group