प्रतिनिधी / लोहारा
तालुक्यातील सालेगाव येथे इंद्रायणी बहुउद्देशीय संस्थेच्या बाल रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात आले, या रुग्णालयाच्या माध्यमातून विविध ठिकाणच्या लोकांना मोठ्या शस्त्रक्रिया व विविध आजारावरील उपचार देण्यात येणार आहेत. यावेळी बाल रुग्णालयाचे भूमी पूजन पार्वती मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी इंद्रायणी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष मनोज देशपांडे, सचिव गोपाळ माने, चेरमन मुरलीधर पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र बिराजदार, भिमसेन माने, महादेव गोरे, नितीन देशपांडे, अण्णाराव देशपांडे, संतोष भालेराव, लहू साळुंके, महेश साळुंके, बालाजी मातोळे, महेश देशपांडे, प्रताप कांबळे मुबारक शैख, अब्बास शेख, बाबू शैख, हणमंत सगर, राजेंद्र मातोळे, यल्लाप्पा दंडगुले, श्रीकृष्ण चेंडके आदी उपस्थित होते.