प्रतिनीधी / शिराढोण
मराठा समाजाला कुणबी-मराठा ओबीसीमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या 11 दिवसांपासून मनोज जरंगे पाटील हे अमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणास समर्थन म्हणून शिराढोण येथील ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारी (दि.8) छत्रपती संभाजी राजे चौकात लाक्षणीक उपोषण करण्यात आले.
या लाक्षणिक उपोषणात गावातील पद्माकर पाटील, नितीन आबा पाटील,नामदेव माकोडे, संजय शेळके, सुरेश महाजन, राजपाल देशमुख, गणेश महाजन, अमर पाटील, भैरवनाथ माकोडे, चंद्रसेन कणसे, अनुपकूमार परदेशी, अवधुत पाटील, राजाभाऊ पाटील,बापुसाहेब शिंदे,शाम पाटील, वैभव यादव, मोहन ठोंबरे यांनी सहभाग घेतला.