प्रतिनिधी । शिराढोण
दाभा (ता.कळंब) येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री बेलेश्वर महादेव मंदीर सभागृहासाठी आमदार कैलास पाटील यांच्या निधीतून 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाचे भूमिपूजन परंपरागत चालत आलेल्या भंडारा कार्यक्रमात करण्यात आले. भूमीपूजन प्रसंगी हभप पांडूरंग महाराज शिंपले, पालकर महाराज, माजी पंचायत समिती सदस्य राजेश्वर पाटील, रणजीत गवळी, अवधूत पाटील, शेतकरी संघटनेचे विष्णूदास काळे, परमेश्वर टेळे,
विष्णू टेळे, सुधा टेळे, प्रकाश टेळे, दादा टेळे, बालासाहेब टेळे, ग्रामसेवक पवार, नागनाथ स्वमी, अविष्कार टेळे, अशोक यादव, रमेश माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
भंडारा कार्यक्रम उत्साहात
दाभा येथील जागृत देवस्थान श्री बेलेश्वर महादेव मंदिराचा भंडारा कार्यक्रमही उत्साहात संपन्न झाला.यानिमित्त हभप पांडूरंग महाराज शिंपले यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आवाड शिरपूरा, हिंगणगाव, शिराढोण व दाभा येथील भाविक भक्तांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी कृषीभूषण पांडूरंग आवाड यांच्यासह ग्रामसेवक सुहास पवार तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.