प्रतिनिधी / धाराशिव
मल्लिकार्जुन खर्गे व प्रियांक खर्गे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने त्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
भाजपने म्हटले आहे की, स्वातंत्र्यवादी सावरकर यांच्याबद्दल कर्नाटक काँग्रेसचे मंत्री प्रियांक मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ मल्लिकार्जुन खर्गे व प्रियंक खर्गे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जोडे मारून दहन करण्यात आले.
कर्नाटकचे कॉग्रेसचे मंत्री प्रियंक खर्गे हे हिंदु द्वेषा पोटी सावरकर यांच्या विरोधात सातत्याने चुकीचे व निषेधार्ह वक्तव्य करतात. सातत्याने होत असलेल्या टिकेमुळे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन दहन करण्यात आले. महाराष्ट्रातील उध्दव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे हे मूग गिळून गप्प का आहेत? हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सावरकरांना गुरु स्थानी मानत. आज त्यांच्या मित्रपक्ष असलेला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व त्यांच्या पक्षातील सर्व नेते मंडळी खालच्या पातळीवर जाऊन टिका–टिपणी करत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मुग गिळुन गप्प का आहे, असा प्रश्न सर्व हिंदुप्रेमीच्या मनात निर्माण झाला असून,
यापुढे आमच्या कोणत्याही श्रध्दा स्थानाविषयी टिका- टिप्पणी केली तर भारतीय जनता युवा मोर्चा त्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही,असा इशारा देण्यात आला.
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रविण पाठक, युवराज नळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल काकडे, भाजपा शहराध्यक्ष अभय इंगळे, अभिजीत काकडे, पंडीत मंजुळे, दुर्गाप्पा पवार, रमण जाधव, अमोल राजेनिंबाळकर, सचिन लोंढे, दत्ता पेठे, स्वप्नील नाईकवाडी, अमित कदम, प्रसाद मुंडे, गणेश एडके, धनराज नवले, नवनाथ सोलंनकर, सार्थक पाटील, गणेश मोरे, नरेन वाघमारे, किशोर पवार, राजकुमार भाऊ पवार, सौरभ काकडे, व्यंकटेश कोळी, ओंकार देवकते, शंकर मोरे, अमीर सौदागर, पुष्पकांत माळाळे, मेसा जानराव, अमोल पेठे, आनंद भालेराव, शेषेराव उंबरे, नामदेव नायकल, लक्ष्मण माने ,गणेश गोरे, रोहित देशमुख, अजिंक्य राजेनिंबाळकर, सुनिल पंगुडवाले आदींसह भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.