आषाढी एकादशीनिमित्त प्रयोग, विठ्ठलाचे अमृत रूप,
दोन मिमी आकाराचे मायक्रो तांदूळ शिल्प
प्रतिनिधी / धाराशिव
आषाढी एकादशीचे निमित्त साधून धाराशिव शहरातील समता नगर येथील कलायोगी आर्ट्सचे राजकुमार कुंभार यांनी आपल्या कलाविष्कारातून तांदळावर तब्बल रुंदी 1.5 मिमी व उंची 7 मिमी आकाराचे विठ्ठलाचे शिल्प कोरले आहे. अगदी सुईच्या टोकावरून सुरू झालेले हे काम तब्बल एक तासांत पूर्ण करून त्याचे रंगकाम एक तासात पूर्णत्वास नेले आहे.यापूर्वी कुंभार यांनी चित्रासह विविध महान कलाकृती साकारत वेगवेगळे विक्रम केले आहेत. त्यांच्या या प्रयोगाचीही विशेष नोंद होऊ शकते.
विठ्ठलाचे अमूर्त रूप इतके सूक्ष्म असून पाहण्यासाठी भिंग वापरावा लागेल. या अनोख्या कलाकृतीची येत्या काही दिवसात एका नवीन विक्रमात नोंद होईल, असा विश्वास कलायोगी आर्ट्सच्याच्या टीमकडून व्यक्त करण्यात आला आहे.यापूर्वी राजकुमार कुंभार यांच्या सोळा कलाकृतींच्या नोंदी एक्सक्लुझिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया बुकमध्ये झाल्या आहेत.या कलाकृतीबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.