आरंभ मराठी / कळंब
कळंब पोलीस ठाणे हद्दीत १६ वर्षीय
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती. त्यावेळी गावातीलच दोन तरुणांनी तिला बोलावून काही बोलायचे आहे असे सांगत जवळील गोडाऊनमध्ये नेले. तेथे त्यांनी तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पिडीत मुलीने दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64(1), 49, 3(5) सह कलम 4,5(एम), 6 पोस्को ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.








