• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, May 26, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्याला यश; अपर विभागीय आयुक्त कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 10, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
263
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी : औसा/लातूर

लातूर जिल्ह्याच्या प्रशासकीय विकासासाठी महत्त्वपूर्ण घडामोड घडत असून, आमदार अभिमन्यू पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. लातूर येथे स्वतंत्र अपर विभागीय आयुक्त कार्यालय सुरू करण्याच्या मागणीसंदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सखोल आणि सकारात्मक चर्चा झाली.

या वेळी आमदार पवार यांनी लातूरसह धाराशिव, नांदेड, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांतील नागरिकांना सध्या छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या एकमेव विभागीय आयुक्त कार्यालयावर अवलंबून राहावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना लांबचा प्रवास करावा लागतो, ज्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत असून सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने विभागीय आयुक्तालयाच्या विभाजनाची घोषणा करूनही ती अद्याप प्रत्यक्षात आलेली नसल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर बनला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लातूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विविध शासकीय विभागांची २५ पेक्षा अधिक कार्यालये कार्यरत आहेत. स्वतंत्र विभागीय आयुक्तालयासाठी नागरिकांकडून मागील १५ वर्षांपासून सातत्याने मागणी होत असून, न्यायालयीन लढा आणि आंदोलनाच्या माध्यमातूनही हा प्रश्न पुढे नेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, लातूर येथे विभागीय आयुक्तालयासाठी स्वतंत्र आणि अद्ययावत इमारतही तयार आहे. शासनाने नेमलेल्या दांगट समितीने २०१५ मध्ये लातूरला प्राधान्य देत सकारात्मक शिफारस केली होती, मात्र त्या अहवालावर अद्याप अंतिम निर्णय न झाल्याने हा प्रश्न प्रलंबितच आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, जनतेची महसुली व प्रशासकीय कामे सुलभ आणि जलद व्हावीत, तसेच होणारी गैरसोय तात्पुरती का होईना कमी व्हावी, यासाठी स्वतंत्र विभागीय आयुक्तालय मंजूर होईपर्यंत लातूर येथे अपर विभागीय आयुक्त कार्यालय तातडीने सुरू करण्यात यावे, अशी ठाम आणि आग्रही मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक भूमिका दर्शवली असून, लवकरच याबाबत योग्य आणि ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लातूरसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा निर्णय झाल्यास प्रशासकीय व्यवस्था अधिक कार्यक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख होणार असून नागरिकांची धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

लातूरकरांच्या दीर्घकालीन आणि जिव्हाळ्याच्या मागणीला मिळालेला हा सकारात्मक प्रतिसाद जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत असून, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#AbhimanyuPawar#success#Positive
SendShareTweet
Previous Post

काँग्रेसमध्ये संघटन मजबुतीकरणाचा बिगुल; जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चेला वेग, तरुण चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता

Next Post

मॉर्फ फोटोमुळे धाराशिवमध्ये राजकीय संभ्रम; पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा उधाण

Related Posts

इंधन दरवाढीचा चौकार, आज पुन्हा दरवाढ; दहा दिवसांत पेट्रोल-डिझेल ८ रुपयांनी महाग

May 25, 2026

अधिक मासातील रविवारमुळे गर्दीने फुलली तुळजाई नगरी

May 24, 2026

महिलेच्या गळ्याला चाकू लावून सोन्याचे दागिने लुटले

May 21, 2026

पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर ९७८ कोटी विमा द्या; आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

May 21, 2026

२०११ पूर्वीच्या अतिक्रमणांना नियमितीकरणाचा मार्ग मोकळा; कळंब शहरातील शेकडो कुटुंबांना दिलासा

May 21, 2026

मनोज जरांगे-पाटील यांच्या इशाऱ्यानंतर सरकारचा मोठा निर्णय; मराठा तरुणांसाठी दिले ‘हे’ आदेश

May 21, 2026
Next Post

मॉर्फ फोटोमुळे धाराशिवमध्ये राजकीय संभ्रम; पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा उधाण

सैन्य दलात २८ वर्षे सेवा; सुभेदार डोंगरे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक

ताज्या घडामोडी

मेडसिंगा पाटीजवळ भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी

May 25, 2026

इंधन दरवाढीचा चौकार, आज पुन्हा दरवाढ; दहा दिवसांत पेट्रोल-डिझेल ८ रुपयांनी महाग

May 25, 2026

अधिक मासातील रविवारमुळे गर्दीने फुलली तुळजाई नगरी

May 24, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group