• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, May 20, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पंधरा लाख भाविकांचा उसळला जनसागर; ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात येडेश्वरी यात्रेत चुना वेचण्याचा सोहळा

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 4, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
245
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / येरमाळा

‘आई राजा उदो उदो, येडूसरुचा उदो उदो’च्या गजराने येरमाळानगरी दुमदुमून गेली असताना येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला चुना वेचण्याचा सोहळा शुक्रवारी (ता. ३) अभूतपूर्व उत्साहात पार पडला. यंदा तब्बल पंधरा लाखांहून अधिक भाविकांनी या पारंपरिक सोहळ्यात सहभाग घेतल्याने यात्रेने गर्दीचा नवा विक्रम नोंदविला.

सकाळी साडेआठ वाजता देवीची पालखी डोंगरावरील मुख्य मंदिरातून वाजतगाजत आमराई मंदिराकडे प्रस्थान पावली. पालखी चुन्याच्या रानात दाखल होताच लाखो भाविकांनी चुनखडीचे खडे वेचून पालखीवर अर्पण करत ‘आई राजा उदो उदो’चा एकच जयघोष केला. भाविकांच्या या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. या सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर अपार श्रद्धा, ऊर्जा आणि आनंदाचे भाव पाहायला मिळाले.

अनेक भाविकांनी हा अविस्मरणीय क्षण डोळ्यांत साठवून ठेवताना दोन क्षण डोळे मिटून देवीचे स्मरण केले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक या सोहळ्यासाठी दाखल झाले होते.
यात्रेनिमित्त देवीची पालखी आता पुढील पाच दिवस आमराई मंदिरात मुक्कामी राहणार असून या काळात पशुप्रदर्शन, आराध्यांचा मेळा, कुस्ती स्पर्धा, शोभेच्या दारूची आतिषबाजी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. ७) घुगरी महाप्रसादानंतर देवीची पालखी मुख्य डोंगरावरील मंदिराकडे प्रस्थान करणार असून त्यानंतर यात्रोत्सवाचा समारोप होणार आहे.

दरम्यान, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तुळजाभवानी देवस्थानचे महंत तुकोजीबुवा यांच्या हस्ते हेलिकॉप्टरद्वारे पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या दृश्याने भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यात्रेच्या पारंपरिक प्रथेनुसार, पालखी परतल्यानंतर मंदिर चुन्याने रंगवले जाते. त्यामुळे चुना वेचण्याच्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. ही परंपरा पिढ्यान् पिढ्या जपली जात असल्याने दरवर्षी भाविक मोठ्या श्रद्धेने या यात्रेत सहभागी होतात.

पालखी मार्गावर बाजार चौक, वाणी गल्ली, रोकडेश्वर मारुती मंदिर चौक, छत्रपती मार्केट, संभाजीनगर रस्ता येथे महिला भाविकांनी रांगोळ्या काढून व फुलांची सजावट करून वातावरण अधिक मंगलमय केले होते.

भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, तर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. तथापि, यात्रेनंतर परतीच्या प्रवासात वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने सोलापूर-बीड महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. रात्री उशिरापर्यंत वाहतूक संथ गतीने सुरू होती. यात्रेदरम्यान इंटरनेट सेवा विस्कळित झाल्याने शनिवारी दुपारपासून रविवारी सायंकाळपर्यंत ऑनलाइन व्यवहारही ठप्प झाल्याचे दिसून आले.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #million#devotees#YedeshwariYatra#chanting
SendShareTweet
Previous Post

शिवसेना जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांच्याकडून येडेश्वरी यात्रेत महा अन्नदान

Next Post

रखरखत्या उन्हात वन्यजीवांसाठी पाणवठ्याचा आधार; पळसप येथील पाणवठ्यावरचे क्षण ट्रॅप कॅमेऱ्यात कैद

Related Posts

मार्चमधील अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ‘इतक्या’ कोटींची मदत जाहीर

May 19, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ६२ लाखांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

May 18, 2026

आज होणाऱ्या सरपंच आरक्षण सोडतीकडे तालुक्याचे लक्ष

May 18, 2026

15 व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपावरून जिल्हा परिषदेत वाद; महाविकास आघाडीचे सदस्य आक्रमक

May 17, 2026

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026
Next Post

रखरखत्या उन्हात वन्यजीवांसाठी पाणवठ्याचा आधार; पळसप येथील पाणवठ्यावरचे क्षण ट्रॅप कॅमेऱ्यात कैद

शिक्षकाची विद्यार्थ्याला काठीने अमानुष मारहाण; शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

ताज्या घडामोडी

Breaking पीकविमा रोखण्यासाठी विमा कंपनीचा नवा डाव; ३३६ कोटींच्या दाव्यावर केंद्रीय समितीकडे अपील

May 19, 2026

मार्चमधील अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ‘इतक्या’ कोटींची मदत जाहीर

May 19, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ६२ लाखांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

May 18, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group