• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, May 1, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव पंचायत समितीवर पाचव्या महिला सभापती म्हणून यांची लागली वर्णी; उपसभापती पदाचेही नाव निश्चित

Aarambha Marathi by Aarambha Marathi
March 6, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.5k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या धाराशिव पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी आज (दि.६ मार्च) निवडणूक होत असून या वेळी महिला सभापती विराजमान होणार आहेत. यापूर्वी चार महिलांनी हे पद भूषविले असून आता ६० वर्षांच्या इतिहासात पाचव्यांदा महिला सभापतीची नोंद होणार आहे. महायुतीचे बहुमत असल्यामुळे भाजपचा उमेदवार सभापती होणार हे निश्चित होते.

त्यामुळे सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दुपारी बारापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत भाजपकडून सभापती पदासाठी एक आणि उपसभापती पदासाठी एक असे दोनच अर्ज दाखल झाल्यामुळे सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार हे स्पष्ट झाले.

भाजपकडून इर्ला पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या गोकर्णा गोपाळ कदम या सभापती पदावर विराजमान होणार आहेत, तर वडगाव सिद्धेश्वर गणातून निवडून आलेले प्रमोद पाटील यांची उपसभापती म्हणून निवड होणार आहे. पंचायत समितीच्या २४ गणांसाठी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १२ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले, तर शिवसेना (शिंदे गट) २ जागांवर विजयी झाली. याशिवाय भाजप पुरस्कृत एक उमेदवारही विजयी झाला आहे. त्यामुळे महायुतीने मिळून स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आठ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) एका जागेवर विजयी झाली आहे. एकूण संख्याबळ पाहता पंचायत समितीवर महायुतीचे स्पष्ट वर्चस्व दिसून येत आहे. धाराशिव पंचायत समिती ही तुळजापूर व धाराशिव-कळंब या विधानसभा मतदारसंघांत विभागली आहे.

तालुक्यातील ७२ गावे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत, तर उर्वरित गावे कळंब मतदारसंघात येतात. यंदाचे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे या प्रवर्गातील भाजपच्या पाच महिला सदस्यांमध्ये चुरस निर्माण झाली होती. अखेर पक्षांतर्गत चर्चेनंतर गोकर्णा गोपाळ कदम यांच्या नावावर एकमत झाले. त्यामुळे त्या धाराशिव पंचायत समितीच्या २१ व्या सभापती ठरणार आहेत.

या निवडणूक प्रक्रियेसाठी धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख हे पीठासन अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत. धाराशिव पंचायत समितीच्या ६० वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत २० सभापती होऊन गेले आहेत. त्यापैकी खालील चार महिलांनी विविध कालखंडात सभापतीपद भूषविले आहे –
जयश्री किशोर दाणे (१४ मार्च २००२ ते २० जून २००३)
रुक्मिणी विश्वनाथ माळी (३० जून २००३ ते ९ फेब्रुवारी २००५)
प्रेमलता संजय लोखंडे (१४ मार्च २०१२ ते १५ मे २०१५)
हेमा महेश चांदणे (३१ डिसेंबर २०१९ ते २०२२)
आता गोकर्णा गोपाळ कदम यांच्या रूपाने धाराशिव पंचायत समितीला ६० वर्षांच्या इतिहासात पाचवी महिला सभापती मिळणार आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #Dharashiv#PanchayatSamiti#woman#chairperson#post#DeputyChairman#fixed
SendShareTweet
Previous Post

९७.९६ किलो गांजा वाहतूक प्रकरणी तिघांना प्रत्येकी १२ वर्षे सक्तमजुरी आणि दीड लाख रुपये दंड

Next Post

अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; कोणाला मिळणार कर्जमाफी वाचा सविस्तर

Related Posts

दुष्काळाच्या छायेतही पर्यटनावर भर; जिल्हा नियोजन बैठकीत चारा-पाणी टंचाईकडे दुर्लक्ष

May 1, 2026

अभ्यासपूर्ण मांडणीला दाद; पालकमंत्र्यांकडून अर्चनाताई पाटील, कलेक्टर व एसपींचे कौतुक

May 1, 2026

151 फुटी भगवा ध्वज उभारण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

May 1, 2026

खरीप आढावा बैठकीत २२ कोटींच्या योजनेची माहिती लपवली; आमदार कैलास पाटील यांनी कृषी विभागाचे काढले वाभाडे

May 1, 2026

महाराष्ट्र दिनी धक्कादायक घटना ; वेतनाच्या मागणीसाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

May 1, 2026

भूम नगर परिषदेतील भ्रष्टाचाराविरोधात १५ नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

April 30, 2026
Next Post

अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; कोणाला मिळणार कर्जमाफी वाचा सविस्तर

प्रतीक्षा संपली, 'या' तारखेला मिळणार पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेतही पर्यटनावर भर; जिल्हा नियोजन बैठकीत चारा-पाणी टंचाईकडे दुर्लक्ष

May 1, 2026

अभ्यासपूर्ण मांडणीला दाद; पालकमंत्र्यांकडून अर्चनाताई पाटील, कलेक्टर व एसपींचे कौतुक

May 1, 2026

151 फुटी भगवा ध्वज उभारण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

May 1, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group