• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, June 5, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव जिल्हा परिषदेत ५ तर पंचायत समित्यांमध्ये २२ स्वीकृत सदस्यांना संधी मिळणार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
March 5, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
262
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

स्वीकृत सदस्य नियुक्तीचा निर्णय लवकरच होणार लागू; इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

सज्जन यादव / आरंभ मराठी

धाराशिव –

धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचा मार्ग राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे मोकळा झाला असून, धाराशिव जिल्हा परिषदेत किमान ५ तर जिल्ह्यातील ८ पंचायत समित्यांमध्ये सुमारे २० ते २२ स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे. जिल्हा परिषद सदस्य संख्येच्या १० टक्के आणि पंचायत समिती सदस्य संख्येच्या २० टक्के सदस्य स्वीकृत म्हणून नियुक्त करता येणार असल्याने स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. निवडणुकीत संधी न मिळालेल्या इच्छुकांना आता ‘स्वीकृत सदस्य’ म्हणून संधी मिळणार असल्याने आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. स्वीकृत सदस्य नियुक्तीचा अधिकृत निर्णय अजून जिल्हा प्रशासनाकडे आला नसला तरी लवकरच तो निर्णय येणे अपेक्षित आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची तरतूद करण्याचा प्रस्ताव राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला होता. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि स्थानिक प्रशासनात अधिक प्रभावी सहभाग मिळावा या उद्देशाने हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मंत्रिमंडळाने या प्रस्तावास गुरुवारी (दि.२६) मंजुरी दिल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील आठवड्यात यासंदर्भात अधिकृत निर्णयाची घोषणा होऊन तसा लेखी आदेश जिल्हा प्रशासनाकडे येण्याची शक्यता आहे.

धाराशिव जिल्हा परिषदेत सध्या एकूण ५५ सदस्य निवडून आलेले आहेत. त्यामध्ये भाजपचे १९, शिवसेनेचे १५, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ६, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे ७, काँग्रेसचे ३, अपक्ष ४ आणि समाजवादी पक्षाचा १ सदस्य निवडून आलेला आहे. या संख्येच्या १० टक्के नियमानुसार जिल्हा परिषदेत किमान ५ स्वीकृत सदस्य नेमणे बंधनकारक राहणार आहे. सत्तास्थिती पाहता महायुतीला ४ तर महाविकास आघाडीला १ स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपला २ आणि शिवसेनेला २ सदस्य नियुक्त करण्याची संधी मिळू शकते. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात समन्वय साधून एकाला प्रतिनिधित्व देण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छुकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

हा निर्णय पंचायत समितीसाठी देखील लागू होणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील ८ पंचायत समित्यांमध्ये एकूण ११० सदस्य आहेत. त्याच्या २० टक्के नियमानुसार सुमारे २० ते २२ स्वीकृत सदस्य नियुक्त करता येणार आहेत. त्यामध्ये भूम पंचायत समितीत २, वाशीमध्ये १, कळंबमध्ये ३, धाराशिवमध्ये ५, परांडा २, तुळजापूर ४, लोहारा २ आणि उमरगा पंचायत समितीत २ स्वीकृत सदस्य नेमण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र मर्यादित जागांमुळे अनेकांना संधी मिळू शकली नव्हती. अशा कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्याचे आश्वासन काही नेत्यांनी दिले होते. आता मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे या कार्यकर्त्यांच्या आशा पुन्हा जागृत झाल्या असून स्वीकृत सदस्यपदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने राजकीय पक्षांच्या नेत्यांसमोर समतोल राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. प्रत्येक पक्षाकडून इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नियुक्ती करताना राजकीय समीकरणे, कार्यकर्त्यांचे योगदान आणि पक्षनिष्ठा यांचा विचार केला जाणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याच्या निर्णयामुळे स्थानिक प्रशासनात अनुभवी आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी मिळणार असून ग्रामीण भागातील विकासकामांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्वीकृत सदस्य पदावर डोळा ठेवून कार्यकर्त्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केलेली आहे. स्वीकृत सदस्य नियुक्तीचा निर्णय झाला असला तरी त्यासंदर्भात अधिकृत निर्णय जिल्हा प्रशासनाला अजूनही प्राप्त झालेला नाही. परंतु, इच्छुक कार्यकर्ते मात्र कामाला लागले आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #Dharashiv#ZillaParishad#members#Panchayat#Committees#opportunity
SendShareTweet
Previous Post

धाराशिव शहरात पुन्हा गूढ आवाज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

९७.९६ किलो गांजा वाहतूक प्रकरणी तिघांना प्रत्येकी १२ वर्षे सक्तमजुरी आणि दीड लाख रुपये दंड

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

९७.९६ किलो गांजा वाहतूक प्रकरणी तिघांना प्रत्येकी १२ वर्षे सक्तमजुरी आणि दीड लाख रुपये दंड

धाराशिव पंचायत समितीवर पाचव्या महिला सभापती म्हणून यांची लागली वर्णी; उपसभापती पदाचेही नाव निश्चित

ताज्या घडामोडी

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group