प्रतिनिधि / येडशी :-
शिक्षक दिनानिमित्ताने श्री अंनंत तरे फाऊंडेशनठाणे यांच्या मार्फत ग्रामीण भागातील गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळांना मदत म्हणून (दि 05) मंगळवार रोजी धाराशिव तालुक्यातील येडशी येथील सनराईज इंग्लिश स्कूल या शाळेला दोन संगणक भेट देण्यात आले.आनंद तरे फाऊंडेशन अध्यक्ष डॉ.दक्षता अनंत तरे यांनी येडशी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.बापू जगदे यांच्या मार्फत सनराईज इंग्लिश स्कूल मधील शैक्षणिक उपक्रम व गुणवत्तेची माहिती घेतली होती. शाळेची गुणवत्ता तसेच शाळेत शिकणाऱ्या शेतकरी,मजूर, कष्टकरी वर्गातील मुलांच्या पाल्यांना संगणकीय ज्ञान देता यावे म्हणून त्यांनी शाळेला दोन संगणक देण्याचे कबूल केले.
या कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष श्री. रामचंद्र देशमुख,संस्था सचिव मंगेश देशमुख, भोसले हायस्कूल उस्मानाबादचे उप मुख्यद्यापक सिद्धेश्वर कोळी सर,के.के.जाधव, येडशीतील प्रतिष्ठित नागरिक विजय भोसले, सामाजिक कार्यकर्ते श्री बापू जगदे,येडशी ग्रापंचायत सदस्य महेश पवार,लोकमतचे पत्रकार श्री. दत्ता पवार, महाराष्ट्र कोळी संघाचे ता.अध्यक्ष नीलेश तपसे,संतोष माने तसेच शाळेचे मुख्यध्यापक गणेश देशमुख, व सनराईज इंग्लिश स्कूल येडशी चे सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होते.या वेळी गणेश देशमुख यांनी अनंत तरे फाउंडेशन ठाणे च्या अध्यक्ष डॉ. दक्षता अनंत तरे, संजय तरे या सर्वांचे शाळा व संस्थेच्या वतीने खूप खूप आभार मानले.