• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, March 21, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अभूतपूर्व उत्साहात साजरा होणार यंदाचा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन; अमृतमहोत्सवानिमित्त 26 जानेवारीपर्यंत संपूर्ण मराठवाड्यात सांस्कृतिक कार्यक्रम

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 30, 2023
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
143
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

मुक्तीसंग्रामातील संघर्षाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

 

प्रतिनिधी / मुंबई

भारतीय स्वातंत्र्यानंतरही निजामाच्या जोखडात अडकलेल्या मराठवाड्याला 17 सप्टेंबर 1948 रोजी खरी मुक्ती मिळाली.या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण मराठवाडा सज्ज झाला असून, या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्वत्र कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात येत्या 17 सप्टेंबरपासून 26 जानेवारीपर्यंत विविध जनजागृतीपर तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

निजामाच्या ताब्यातून खऱ्या अर्थाने मुक्त झालेल्या मराठवाडा मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या संघर्षाची माहिती नवीन पिढीसह देशभरातील नागरिकांना होणे आवश्यक आहे. मुक्तीसंग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने यानिमित्त मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करून मुक्तीसंग्रामाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्त मंत्रिमंडळाची बैठक घेण्याबाबत मुख्यमंत्री यांना विनंती करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांचा मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सीमा व्यास, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, मराठवाडा विभागीय आयुक्त मधुकर आर्दड, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

चौकांचे सुशोभीकरण, हुतात्मा स्मारकांवर विद्युत रोषणाई

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त 15 ते 17 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम केंद्रभागी ठेवून विविध स्पर्धा, दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच माहितीपट तयार करण्याचे निर्देश मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी दिले. ते म्हणाले की, औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी असल्याने शहरामध्ये शासकीय इमारती, तसेच पथदिव्यांवर रोषणाई करावी तसेच चौकांचे सुशोभीकरण, भिंतींवर सयुंक्तिक चित्रे, रंगरंगोटी करावी. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांवरही रोषणाई करण्यात यावी.

संपूर्ण मराठवाड्यात कार्यक्रम

मराठवाडा मुक्तीसंग्रामाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सर्वांना सहभागी होता यावे यासाठी 26 जानेवारीपर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी दिले. यामध्ये प्रभातफेरी, व्याख्याने, विविध गटांच्या मॅरेथॉन स्पर्धा, लोककला, भारूड, पोवाडे आदी सांस्कृतिक कार्यक्रम, गीत गायन, चित्रकला, निबंध आदी स्पर्धा, महानाट्य स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या कला गुणदर्शनाचे कार्यक्रम, नवरात्रौत्सवात महिलांसाठी स्पर्धा, प्रबोधनकार/ कीर्तनकारांची परिषद, चित्ररथ, रॅली आदींचे आयोजन करण्याची सूचना त्यांनी केली. सर्व कार्यक्रमांची मध्यवर्ती कल्पना ही मुक्तीसंग्राम ही असावी. तसेच कार्यक्रमांमध्ये सुसूत्रता आणि समन्वय असावा, असे निर्देशही त्यांनी दिले. विविध माध्यमांचा कल्पकतेने वापर करून कार्यक्रमांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने देशभरातील नागरिकांना आवाहन करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत माहितीपट तयार करण्यात येणार असून कॉफी टेबल बुक देखील तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक उभारण्याचे नियोजन आहे. याबाबतचा आढावा घेऊन मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी त्याबाबत सूचना केल्या. या स्मारकामध्ये मराठवाडा मुक्तिसंग्रामाविषयी प्रदर्शनी, आर्ट गॅलरी, प्रेक्षागृह, नाट्यमंच, ग्रंथालय, उपाहारगृह, आदी सुविधा योग्य प्रमाणात असाव्यात. त्याकरीता देशभरातील उत्तमोत्तम संग्रहालये आणि स्मारकांची पाहणी संबंधित समितीने करावी, अशी सूचनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. हे स्मारक मराठवाडा मुक्तिसंग्रामाची खरी गाथा लोकांसमोर मांडणारे झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.

SendShareTweet
Previous Post

पोलिसांना आव्हान;चोरट्यांनी भर चौकातील एटीएम मशीन केली गायब, श्वान पथकही फेल

Next Post

दहीहंडी खेळातील गोविंदांना सरकारी नोकरी देण्याचा प्रयत्न, गोविंदा स्पर्धा आता राष्ट्रीय पातळीवर

Related Posts

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025
Next Post

दहीहंडी खेळातील गोविंदांना सरकारी नोकरी देण्याचा प्रयत्न, गोविंदा स्पर्धा आता राष्ट्रीय पातळीवर

दुष्काळाची छाया; सरकारला वस्तुस्थिती कळवा, वाळलेले सोयाबीन आणि बेशरमाच्या फुलांचा बुके तहसीलदारांना भेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

दैनिक आरंभ मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या स्नेह मेळावा

March 21, 2026

धाराशिवमध्ये गूढ स्फोटासारखा आवाज; भूकंप झाल्याच्या चर्चा

March 20, 2026

2020 च्या पीक विमा प्रकरणात पुन्हा ‘तारीख पे तारीख’ आता 23 मार्च रोजी पुढील सुनावणी

March 17, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group