• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, February 1, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

राज्यातील सर्वात सुंदर बसस्थानक; 22 फलाट, भव्य व्यापारी संकुल, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान,मोठे हॉटेल… असं असेल धाराशिवचं नवं बसस्थानक

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 26, 2023
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
1k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आमदार राणा जगजितसिंह पाटील म्हणाले, धाराशिवच्या वैभवात भर पडणार, भव्य व आधुनिक बसस्थान; संकल्पना मांडा, सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

प्रतिनिधी / धाराशिव

तुळजापूर पाठोपाठ आता धाराशिव येथील मध्यवर्ती बसस्थानकाचा कायापालट होणार असून, त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात शंभर दुकानगाळ्यांसह मोठे हॉटेल असलेले भव्य व्यापारी संकुल, कर्मचार्‍यांसाठी सुसज्ज निवासस्थाने, प्रशस्त उपहारगृह, प्रवासी, चालक-वाहक विश्रांती कक्ष आणि तब्बल 22 फलाट (प्लॅटफॉर्म) असतील. जिल्ह्याच्या सौंदर्यात भर टाकणारे हे राज्यातील सर्वात सुंदर बसस्थानक ठरावे, यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या सूचना व संकल्पना जाणून घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी सोमवारी सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

‘गोरोबा काकांची भक्ती आणि तुळजाभवानी देवीची शक्ती’, असा भक्ती आणि शक्तीपीठाचा अनोखा संयोग असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब बसस्थानकाच्या इमारतीत साकारले जाणार आहे. वास्तुविशारद श्री अजय ठाकुर यांना तशा पध्दतीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील आठवड्यात मध्यवर्ती बसस्थानकाचे प्राथमिक संकल्पचित्र प्रकाशित करण्यात आले होते. आता या संपूर्ण परिसरावर साकारल्या जाणार्‍या अत्याधुनिक मध्यवर्ती बसस्थानकाचा सुधारीत ले-आऊट प्लॅन तयार करण्यात आला आहे. या सुधारीत आराखड्यातही जिल्ह्याच्या सौंदर्यात भर टाकणारे काही महत्वपूर्ण बदल सूचविण्यात येणार आहेत. बसस्थानकाची जागा शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने शहर आणि जिल्ह्याच्या सौंदर्यात नवीन बसस्थानकाच्या इमारतीमुळे भर पडणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.

बस डेपोचेही नुतनीकरण

उपलब्ध असलेल्या तीन हेक्टर जागेवर सर्व सोयी-सुविधांनीयुक्त असे मध्यवर्ती बसस्थानकासह अन्य बाबींचे नियोजन करण्यात आले आहे. वाहनतळ, प्रवासी कक्ष, प्रशस्त उपहारगृह, पार्सल विभाग, प्रतिक्षालय, जेनेरिक औषधालय, चालक-वाहक विश्रांतीगृह, कर्मचार्‍यांसाठी निवासस्थाने आणि इतर अनुषंगीक आधुनिक सोयी-सुविधांचा यात समावेश असणार आहे. 22 फलाट असलेल्या या नवीन बसस्थानकाला जोडूनच असलेल्या बसडेपोचेही नुतनीकरण करण्यात येणार आहे.

नागरिकांच्या लेखी सूचना व संकल्पनांचे स्वागत

एकाच वेळी 22 बसगाड्या थांबू शकतील, अशा भव्य बसस्थानकाच्या इमारतीवर स्थानिक गौरवशाली इतिहास आणि संस्कृतीचे प्रतिबिंब साकारण्याचा मानस आहे. त्यानुषंगाने जिल्हाभरातील नागरिकांनी त्यांच्या सूचना आणि अभिनव संकल्पना राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयात जमा कराव्यात. नागरिकांच्या योग्य सूचना व अभिनव संकल्पनांचा या आराखड्यात नक्की समावेश केला जाईल. त्यासाठी 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात सायंकाळी 5 वाजता बैठक आयोजित करण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

SendShareTweet
Previous Post

सामाजिक उपक्रम; शिक्षक संघाच्या वतीने सोमवारी कळंब, भूममध्ये रक्तदान शिबीर

Next Post

मुंबईला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी जानेवारीत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सव; दुबई शॉपिंग फेस्टिव्हलच्या धर्तीवर होणार आयोजन

Related Posts

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025
Next Post

मुंबईला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी जानेवारीत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सव; दुबई शॉपिंग फेस्टिव्हलच्या धर्तीवर होणार आयोजन

वीज कर्मचाऱ्यांना 30 टक्के पगारवाढ द्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

Big Breaking फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; शिवार हादरले

January 31, 2026

निलंबनाच्या कारवाईवरून संभ्रम; संपर्कप्रमुख राजन साळवी अनभिज्ञ, शिवसेनेत पक्षांतर्गत गोंधळ उघड

January 31, 2026

धाराशिवच्या कन्या सुनेत्राताई पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नोंद

January 30, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group