विकासाची आस.. तांत्रिकदृष्ट्या सूचना करण्याचं आवाहन
प्रतिनिधी / तुळजापूर
कुलस्वामिनी तुळजापूरमधील आई तुळजाभवानी मंदिराकडे जाणारा मार्ग सुशोभीकरण आराखडा प्रसिध्द करण्यात आला असून, आपल्याही सूचना असतील कळवाव्यात असे आवाहन तुळजापुरचे आमदार तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त राणा जगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्यास आपल्या सूचनांचा समावेश करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन, कमीत कमी जागेत अधिकाधिक सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न असेल. काही दिवसापूर्वीच आमदार पाटील यांनी तुळजापूरच्या नवीन बसस्थानकाचे संकल्प चित्र प्रसिद्ध केले होते.