प्रतिनिधी / धाराशिव
जिल्ह्यातील जिल्हापरिषद शाळेतील शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवावेत, या मागणीसाठी सोमवारी म्हणजे १२ जून रोजी जिल्हा परिषदे समोर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने लाक्षणिक धरणे अंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांचे अनेक प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी निवेदनाद्वारे व तोंडी पाठपुरवा करुनही प्रलंबित प्रश्न सोवडवले जात नाहीत. याबाबत शिक्षक संघाच्या वतीने ३१ मे रोजी १० जूनपर्यंत प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी केली होती. पण मुख्याध्यापक पदोन्नती वगळता अद्याप एकही प्रश्न अद्याप सुटलेला नाही म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सोमवार १२ जून रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत जिल्हापरिषद समोर धरणे अंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हापरिषद शाळेतील शिक्षकांचे खालील प्रश्न प्रलंबित आहेत .त्यात प्रामुख्याने प्राथमिक शिक्षकांतून प्राथमिक पदवीधर शिक्षक दर्जावाढ देण्यात यावी,विनंती केलेल्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांना पदावनत करावे, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांची पदे भरावीत, पदोन्नतीने भरण्यात येणारी केंद्रप्रमुखाची रिक्त पदे भरावीत,बिंदू नामावली अद्यावत करावी.प्रलंबित पुरवणी देयकासाठी आर्थिक तरतुद करुन देयके पारित करावीत,वैद्यकीय प्रतिपुर्तीचे प्रस्ताव निकाली काढावेत,भविष्य निर्वाह निधीचे परतावा व ना-परतावा अग्रीम प्रस्ताव मान्य करण्याचे अधिकार तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांना द्यावेत, २०२०-२०२१ च्या संच मान्यतेनुसार शिक्षकांचे तात्पुरते केलेले समायोजन कायम स्वरुपी करावे, सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांना रजा रोखीकरणाचा लाभ देण्यात यावा, कोरोना काळात शिक्षकांनी संकलित केलेल्या निधीचा विनियोग करावा,विषय तज्ञ व साधन व्यक्ती यांच्या दिर्घवास्तव्य सेवाजेष्टतेनुसार बदल्या कराव्यात या महत्वाच्या मागण्यासाठी धरणे अंदोलन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी या धरणे अंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे ,राज्य उपाध्यक्ष सोमनाथ टकले,जिल्हाध्यक्ष संतोष देशपाडे राज्य चिटणीस भक्तराज दिवाने, माजी अध्यक्ष एल.बी.पडवळ,विभागीय कार्यध्यक्ष अर्जुन गुंजाळ,जिल्हासरचिटणीस विठ्ठल माने, कोषाध्यक्ष सुधीर वाघमारे ,कार्याध्यक्ष श्रीनिवास गंलाडे, धनजंय मुळे, प्रसिद्धी प्रमुख प्रदिप म्हेत्रे ,बालाजी माळी, प्रवक्ता उमेश भोसले, तालुकाध्यक्ष राहुल भंडारे धाराशिव ,दत्तात्रय पवार कळंब,संतोष मोळवणे वाशी, रामेश्वर शिंदे भुम, शिवाजी शिंदे परांडा, डी.डी.कदम तुळजापुर ,सुदर्शन जावळे लोहारा,बालाजी मसलगे उमरगा महिला आघाडीच्या अनुराधा देवळे,रोहिणी माने,जेमिनी भिंगारे,अरुणा वाघे,जयश्री माळी-ढगे यांनी केले आहे.