प्रतिनिधी / धाराशिव
कळंब तालुक्यातील ईटकूर जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांना जेष्ठ पत्रकार अनंत आडसुळ यांच्या तर्फे नवोदय-शिष्यवृत्ती प्रश्नसंचाचे वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास पावले तसेच आबासाहेब आडसुळ व ज्येष्ठ पत्रकार अनंत आडसुळ, मुख्याध्यापक गरुड यांची प्रमुख उपस्थिती होती.
इटकूर प्रशाला ही सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये एक आगळावेगळा पॅटर्न निर्माण करत असून, कळंब तालुक्यात अव्वल क्रमांकाची प्रशाला म्हणून ओळख निर्माण करत आहे. त्यातच गतवर्षी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेतील इयत्ता पाचवीतील पंधरा विद्यार्थी पात्र झाले होते. त्यापैकी पाच विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत झळकले असुन त्यातील एक विद्यार्थिनी राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे. तसेच नवोदय विद्यालयासाठी या शाळेतून चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे सातारा सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करून परिक्षेस बसवणारी एकमेव प्रशाला ठरली असून त्यातही आठ विद्यार्थी सैनिक स्कूलसाठी पात्र ठरले आहेत. तसेच होणाऱ्या नवोदय स्पर्धा परिक्षेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करून उतुंग यश मिळावे, यासाठी ज्येष्ठ पत्रकार अनंत आडसुळ यांच्याकडून जवळपास 4 हजार 300 रुपये किंमतीचे नवोदय-शिष्यवृत्ती प्रश्नसंचाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रशालेतील शिक्षक अनिल क्षिरसागर, मुख्याध्यापक तुकाराम गरूडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिदास पावले व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.