प्रतिनिधी / वाशी
शहराची झालेली हद्दवाढ आणि झपाट्याने होत असलेले विस्तारीकरण यामुळे पार्थिवाच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशाभूमीपर्यंत खांद्यावरून पार्थिव वाहने नागरिकांसाठी त्रासदायक होत आहे. त्यामुळे नगरपंचायतकडून वैकुंठरथ उपलब्ध करून देण्याची नितांत गरज आहे.

तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे वाशी शहराचे विस्तारीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शहरालगत असलेल्या शेतीच्या ठिकाणीही आता प्लॉटिंग केली जात आहे. परिणामी नवीन लोकवस्ती ही शहरापासून लांब होत चालली आहे. तसेच शहरवाढ झाल्यामुळे उपलब्ध असलेल्या स्मशानभूमी आता शहराच्या मध्यभागात आल्या आहेत. त्यामुळे लोकवस्ती ते स्मशानभुमीचे अंतर लांब झाले आहे. परिणामी हद्दवाढ भागातील नागरिकांना पारंपारिक रीतीने खांद्यावरून स्मशाभूमीपर्यंत पार्थिव वाहणे त्रासदायक होत आहे. त्यामुळे नगरपंचायत ने वैकुंठ रथ तत्काळ उपलब्ध करून देण्याची नितांत गरज आहे.
सुरेश कवडे, उपनगराध्यक्ष नगरपंचायत वाशी
नगरपंचायतच्या वतीने वैकुंठ रथ, पथदिवे क्रेन आणि सिवेज टँकर खरेदी करणे प्रस्तावित करण्यात आले असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच वैकुंठरथासह उपरोक्त नमूद वाहणे नागरिकांच्या सोयीसाठी नगरपंचायत कडून उपलब्ध केली जातील.