प्रतिनिधी/वाशी
तालुक्यातील इंदापूर,पारडी,सरमकुंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वंचित विकास जाणीव संघटनेच्या वतीने व्यक्तिमत्व विकास,नेतृत्व,संवाद,संभाषण,गुणवत्ता यासह विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीवर मार्गदर्शन करण्यात आले.
वंचित विकास जाणीव संघटनेचे रामभाऊ लगाडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासावर प्रबोधन केले. यावेळी सर्व शाळेत विद्यार्थ्यांसाठी अभिरुची वर्ग घेण्यात आला व विद्यार्थ्यांना विविध खेळ,गाणी शिकविण्यात आली.यामध्ये ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी,प्रमाणपत्रासह रोख रकमेचीही बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,कर्मचारी,विद्यार्थी व पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.