भारत माता की जय, वंदे मातरम.. घोषणांनी दुमदुमले कळंब शहर
प्रतिनिधी / कळंब
कळंब शहरामध्ये सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडीकडून सामाजिक किंवा राष्ट्रीय दिनी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.मंगळवारी, स्वातंत्र्य दिनानिमित्त आघाडीच्या वतीने ५७५ फूट तिरंगा झेंडा पदयात्राचे आयोजन करण्यात आले होते.
युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत होण्यासाठी गतवर्षी प्रमाणे यावर्षीही तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पदयात्रेचा शुभारंभ कथले चौक येथून स्व. गणपतरावजी कथले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला.
कथले चौक येथून अहिल्यादेवी होळकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, मुंडे गल्ली असा या पदयात्रेचा मार्ग होता.कार्यक्रमाची सांगता राष्ट्र गीत घेऊन करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी ह.भ.प महादेव महाराज आडसूळ, संजय मुंदडा, अतुल गायकवाड, अनिल हजारे, सुनील गायकवाड, सतपाल बनसोडे, शरद जाधवर, शिवाजी शिरसाठ, प्रकाश भडंगे, माधवसिंग राजपूत, बंडु ताटे, विकास कदम, इम्रान मुल्ला, संतोष भांडे, मकरंद पाटील, बाबू चाऊस, दत्ता लांडगे, लाखन गायकवाड, शिवाजी गिड्डे तसेच कथले आघाडी चे बाळासाहेब कथले, सुमित बलदोटा, सुशील बलदोटा, गोविंद खंडेलवाल, सुजित बलदोटा, भाऊसाहेब शिंदे, अशोक फले, संताजी वीर, यश सुराणा, नवनाथ पुरी, धर्मराज पुरी, मनोज फले, संकेत भोरे, विश्वजित पुरी, मनोज शिंगणापुरे, राहुल किरवे व रेणुका फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी उपस्थित होते.