प्रतिनिधी / अणदूर
तुळजापूर तालुका क्रिडा अधिकारी संचालनालय व श्री श्री गुरुकुल,अणदूर यांच्या वतीने तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेचे शुक्रवारी (दि.१८) आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती तुळजापूरच्या गटशिक्षण अधिकारी एम एम इनामदार यांच्या हस्ते अध्यात्मिक व योग गुरु श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.अध्यक्षस्थानी श्री श्री गुरुकुलचे संस्थापक डॉ. जितेंद्र कानडे हे होते.संचालिका डॉ रूपाली कानडे,तालुका क्रिडा मार्गदर्शक ईसाक पटेल,क्रिडा संयोजक राजेश बिलकुले,क्रिडा शिक्षक दळवी,मुख्याध्यापक शिवराज भुजबळ,दादाराव घोडके,रामेश्वर सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
गटशिक्षणाधिकारी इनामदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की,मोबाईलपासून दूर राहून सदृढ आरोग्यासाठी दैनंदिन योगा आणि प्राणायाम केले पाहिजे.आरोग्य ठिक असेल तर जीवन आनंदी बनते.सर्व यशस्वी स्पर्धकांचे पुष्गुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बंडगर यांनी केले.प्रास्ताविक रामेश्वर सावंत तर आभार शिवराज भुजबळ यांनी मानले.
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
१९ वर्षा खालील गटात सैनिक स्कूल तुळजापूर,१७ वर्षा खालील गटात एकलव्य आश्रम शाळा यमगरवाडी तर १४ वर्षा खालील गटात श्री श्री गुरुकुलने बाजी मारली.या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.