परिवाराचे प्रमुख दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते मोळी पूजन
आरंभ मराठी / धाराशिव
श्री. सिद्धिविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या द्वितीय गाळप हंगामाचा मोळी पूजन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कारखान्याचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी बांधवांची मोठी उपस्थिती होती.

या प्रसंगी श्री. संजय पाटील, श्री. दयानंद पाटील, श्री. दिलीप पाटील, श्री. किरण पाटील, श्री. बालाजी कोरे, श्री. दिनेश कुलकर्णी, श्री. गणेश कामटे, श्री. प्रतिक देवळे, श्री. राजकुमार जाधव, श्री. देविदास कुलकर्णी, श्री. अरविंद गोरे, श्री. रामचंद्र सारडे, श्री. बलराम कुलकर्णी, श्री. मंगेश कुलकर्णी, श्री. अभय शिंदे, श्री. बालाजी जमाले तसेच कारखान्यातील विभाग प्रमुख, कर्मचारी, वाहतूक ठेकेदार आणि शेतकरी उपस्थित होते.
गाळप हंगामाच्या शुभारंभावेळी उपस्थित मान्यवरांनी कारखान्याच्या यशस्वी कार्याचा गौरव करत शेतकरी संपन्नता आणि ग्रीनटेकचा प्रगतीमार्ग यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.












