प्रतिनिधी / धाराशिव
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आणि लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई- ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत रविवारी उपळा (मा.) येथील श्रीराम मंदिरात ) आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 119 रुग्णांची नेत्र तपासणी व ईतर तपासण्या करून नाममात्र दरात चष्मे वाटप आणि मोफत औषधे वाटप करण्यात आले.तत्पूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना तालुकाप्रमूख सतिश सोमाणी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी मुकेश पाटील,शिवसेना शाखाप्रमुख सत्यजित पडवळ, लहू पडवळ, प्रमोद पडवळ, बाळासाहेब पडवळ,शिवाजी पडवळ, सुधाकर खामकर,सुभाष शेटे,अतुल पडवळ, किरण पडवळ, संग्राम पडवळ, श्रीनिवास पडवळ आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते.