युवा नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते रंगमंचाचे भूमिपूजन
आरंभ मराठी / धाराशिव
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, तीन दिवस शिवायन या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. या महानाट्याच्या मुख्य रंगमंचाचा भूमिपूजन सोहळा आज सायंकाळी शिवसेनेचे युवा नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती मध्यवर्ती शिवजयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाची पत्रकारांना दिली.
मल्टिपर्पज हायस्कूल मैदानावर शिवायन महानाट्यचे प्रयोग होणार आहेत . त्यासाठी मुख्य रंगमंचाच्या उभारणीला सुरुवात झाली आहे. रंगमंचाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, विश्वास शिंदे, प्रकाश जगताप, भारत कोकाटे, धनंजय राऊत, राजसिंह राजेनिंबाळकर आदींची उपस्थिती होती. यावेळी नाटकाचा आर्थिक भार उचलल्याबद्दल भैरवनाथ उद्योग समूह आणि धनंजय सावंत यांचे विश्वास शिंदे यांनी आभार मानले. विशेष म्हणजे गेल्यावर्षीच्या शंभूराजे महानाट्य कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी भरीव योगदान दिले होते. यावर्षीही त्यांनी महानाट्य कार्यक्रमाचा आर्थिक भार उचलला आहे.
यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सहकार्याने विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे, अशी माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. महोत्सव समितीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी धाराशिवच्या शिवजयंतीचे वेगळेपण सांगताना वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा सोहळा साजरा केला जाईल, गेली पस्तीस वर्षे हा जयंती सोहळा पक्षभेद विसरून साजरा केला जातो,असे त्यांनी सांगितले. धनंजय सावंत म्हणाले, जयंती सोहळ्यासाठी आम्ही कायम सहकार्याची भावना ठेवू. यावेळी शिवायन नाटकाचे दिग्दर्शक सात्विक ठकार यांनी या नाटकातून महाराजांची शक्ती, युक्ती आणि पराक्रम धाराशिवच्या नागरिकांना पाहायला मिळेल असे सांगितले. नाटकात धाराशिवच्या स्थानिक कलावंतांना देखील संधी दिली जाणार आहे,असेही त्यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब शिंदे, मैनुद्दीन पठाण, मनीषा केंद्रे, सिद्धार्थ बनसोडे यांची उपस्थिती होती.
असे आहेत सोहळा समितीचे कार्यक्रम
१२ फेब्रुवारी – शिवस्वराज्य ध्वजारोहण व छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भव्य किल्ला सजावट व लेझर लायटिंग डेकोरेशनचे उदघाटन,
वेळ – सायं ७ वा.
१३, १४ व १५ फेब्रुवारी – शिवायन महानाट्याचे प्रयोग
वेळ – दररोज सायं ६ वाजता
स्थळ – मल्टीपर्पज हायस्कूल मैदान, धाराशिव
१८ फेब्रुवारी – शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा
वेळ – सायं ७ वाजता
स्थळ – छत्रपती शिवाजी महाराज चौक
उपस्थित – स्नेहलता वसईकर (सोयराबाई – स्वराज्यरक्षक संभाजी मालिका)
१९ फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराजांना महाभिषेक आणि हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
वेळ – सकाळी ८.३०
स्थळ – छत्रपती शिवाजी महाराज चौक
१९ फेब्रुवारी – भव्य मिरवणूक
वेळ – सायं ५ वाजता
स्थळ – जिजामाता उद्यान, धाराशिव.