प्रतिनिधी / कळंब
विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना दिलेल्या ज्ञानाचे दृढीकरण होऊन विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते. विज्ञान प्रदर्शनामुळे विज्ञान व गणित विद्यार्थ्यांना अधिक सुलभ समजते, असे मत ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांनी मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 51 व्या विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी विविध मान्यवर उस्थितीत होते. यावेळी बोलताना धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप मडके म्हणाले की, शालेय जीवनामध्ये मी विज्ञान प्रदर्शनामध्ये माझे प्रयोग सादर केले होते. याच शाळेमध्ये असताना माझ्या प्रयोगाला तालुक्यात पहिला नंबर मिळाला होता. विज्ञान प्रदर्शनामुळे शेती विषयी तंत्रज्ञान, औद्योगिक, नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आपणास माहिती मिळत असते. वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे प्रयोग सादरीकरण करायचे असते. विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो. त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो. त्यांना नवी दृष्टी मिळते. त्यांच्या भविष्यात येणाऱ्या नवनवीन गोष्टी त्यांना हाताळता येतात असे मत व्यक्त केले. यावेळी ज्ञान प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील, मोहाचे माजी सरपंच रमेश मोहेकर, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष माळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कळंब पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते होते. यानीही अध्यक्ष समारोपामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय जगताप यांनी केले.
यावेळी केंद्रप्रमुख प्रशांत निनाळ, साधन व्यक्ती मैंदाड बी.जी. उपस्थित होते.
परीक्षक म्हणून प्रा. नंदकुमार टेकाळे, प्रा.युसूफ शेख, प्रा. बब्रुवान मोरे, प्रा. अमित जाधव, प्रा. जयंत भोसले, प्रा. अशोक नाडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी गिड्डे केले तर आभार दिलीप पाटील यांनी मानले. विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.