प्रतिनिधी / नळदुर्ग
नळदुर्ग (ता.तुळजापुर ) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्रशालेतील सहशिक्षक मोहियोद्दीन सय्यद यांचा वयोमान सेवानिवृत्तीनिमित्त शाळा, शाळा व्यवस्थापन समिती, पालकांतर्फे सपत्नीक सत्कार करून निरोप देण्यात आला.
सय्यद हे जिल्हा परिषद केंद्रिय शाळेत सहशिक्षक म्हणून सेवेत कार्यरत होते. सेवेत असताना शासनाच्या विविध उपक्रमासह उन्हाळ्यात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेच्या आवरात लावलेल्या झाडावर दाना -पाणी ठेवून पक्ष्यासाठी सोय केली. तसेच शाळेच्या आवारात फळ -फुलझाडे फुलविल्याने परिसर हिरवगार दिसत आहे, असे अनेक उपक्रम शाळेत राबवून आदर्श कामगिरी बजावली. दरम्यान सय्यद हे लातूर, धाराशिव जिल्ह्यातील शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करून सोमवारी (दि.३१) सेवानिवृत्त झाले असून, यानिमित्ताने त्यांच्या सत्कार समारंभ सोहळा जि. प. प्रशाला येथे पार पडला. याप्रसंगी गटशिक्षण अधिकारी मेहरून्नीसा इनामदार,मराठवाडा विभाग प्राथमिक शिक्षक संघांचे अध्यक्ष विक्रम पाटील, म. रा. प्रा. शि.संघाचे जिल्हाध्यक्ष बिभीषण पाटील,शिक्षक पतसंस्थेचे बशीर तांबोळी, नळदुर्ग बिट केंद्र प्रमुख सत्तेशवर जाधव, माजी नगरध्यक्ष नय्यरपाशा जाहगीरदार, माजी उपनगराध्यक्ष शहबाज काझी,माजी नगराध्यक्ष नितीन कासार, जिलानी कुरेशी, मुख्याध्यापक भास्कर मस्के,सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय आलूरे,सहशिक्षक बिलाल सौदागर,उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष खमरोद्दीन सय्यद,निजाम इनामदार,मुमताज शेख, खलील इनामदार, सहशिक्षिका सुंदर भालकाटे,वंदना चौधरी, परिचर सुनीता यादगिरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्राजक्ता पिसके, उपाध्यक्ष राम सातपुते, सदस्य मलिक शेख,नेताजी महाबोले, बाहोद्दीन इनामदार यांच्या सह शिक्षक, पालक, विद्यार्थी, नातेवाईक उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिलाल सौदागर यांनी केले तर अध्यक्षीय समरोप गटशिक्षणाधिकारी मेहरून्नीसा इनामदार यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद शमशोद्दीन, सय्यद आवेज, सय्यद रफिओद्दीन, सय्यद मुदस्सर आदींनी परिश्रम घेतले.