विनम्र स्वभाव, साधी राहणी आणि पदोपदी जाणवणारे संस्कार. 5 दशकाहून अधिक काळ राजकारणाचा वारसा असलेल्या आणि घरात सत्तेचा कायम वावर असलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबातल्या या व्यक्तीने युवकांमध्ये अक्षरशः क्रेझ निर्माण केलीय. जणू तिसऱ्या पिढीच्या राजकारणाची धुरा सक्षमपणे खांद्यावर घेऊ शकेल, अशी झलक त्यातून दिसतेय. ही व्यक्ती म्हणजे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे द्वितीय पुत्र मेघ पाटील. आज त्यांचा 23 वा वाढदिवस असून, यानिमित्ताने त्यांनी युवकांसाठी नवं पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज तुळजापुरात युवकांसाठी संघटन सुरू करत आहेत. यातून युवकांचे प्रश्न सोडवले जातील असा त्यांना विश्वास आहे.या नव्या आरंभासाठी आणि वाढदिवसाच्या निमित्ताने दैनिक आरंभ मराठीकडून मेघ पाटील यांना शुभेच्छा.
🌹🌹🎊🎂🎉🎈🎈
गेल्या काही महिन्यांपासून धाराशिव जिल्ह्यातील तरुणांना एका नावाने आकर्षित केले आहे ते म्हणजे मेघ राणाजगजितसिंह पाटील. डॉ पद्मसिंह पाटील यांचे नातू आणि अर्चनाताई पाटील व राणाजगजितसिंह पाटील यांचे द्वितीय चिरंजीव मेघ पाटील यांनी कमी दिवसातच समाजकारणात चर्चेला वाव निर्माण करुन दिला आहे. घरात 5 दशके सत्ता असताना देखील नम्र स्वभाव आणि सुसंस्कृतपणामुळे धाराशिव जिल्ह्यातील लोकांना मेघ पाटील यांच्या रुपात भविष्यातील आश्वासक चेहरा दिसत आहे. आजच्या दिवशी तुळजापूर येथे ‘तेरणा युथ फाउंडेशन’ ची स्थापना केली जाणार आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील तरुणांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देण्याचे स्वप्न मेघ पाटील पाहत आहेत.
हे जरी युथ फाउंडेशन असले तरीदेखील तरुणांसोबतच महिला, वृद्ध, दिव्यांग या सर्व घटकांसाठी काम करण्याचा मेघ पाटील यांचा मानस आहे. राजकारणाचे दार समाजकारणातूनच उघडते हे जरी खरे असले तरी सध्या मला फक्त लोकांसाठी, लोकांमध्ये मिसळून काम करायचे आहे,.असे मेघ पाटील म्हणतात. मागच्या काही दिवसात तुळजापूर तालुक्यातील कित्येक गावात, वाडी वस्तीवर जाऊन मेघ पाटील यांनी लोकांच्या अडचणी समजून घेतल्या. काही लोकांच्या अडचणी जागच्या जागी सोडवल्या. लोकांच्या अडचणी समजून घेताना त्यांनी लोकांमध्ये थेट मिसळून त्यांच्याशी संवाद साधला. काही लोकांना मेघ पाटील यांच्यात डॉ. पद्मसिंह पाटील यांची ऊर्जा दिसते तर काहींना राणा पाटील यांचा नम्रपणा दिसतो. आजोबा डॉ पद्मसिंह पाटील यांनी पाच दशकांपूर्वी अशाच सामाजिक उपक्रमातून राजकारणातील बाराखडी गिरवण्यास सुरुवात केली होती.
राजकारणात येणार का, असा प्रश्न केल्यानंतर मेघ पाटील म्हणतात, फक्त लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करायचे आहे. तेरणा युथ फाउंडेशनच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील तरुणांसाठी प्रगतीची संधी निर्माण करण्यासाठी जे जे करता येईल ते सर्व करण्याची तयारी आहे, अशी भावना मेघ पाटील व्यक्त करतात. तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिराच्या राजे शहाजीराजे महाद्वार येथे आज सायंकाळी ‘तेरणा युथ फाउंडेशन’ ची सुरुवात होत आहे. तेरणा युथ फाउंडेशनच्या माध्यमातून काम करण्यासाठी आई तुळजाभवानी त्यांना आशीर्वाद आणि ऊर्जा देवो याच सदिच्छा.!