विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे यांचा प्रहार,चहापानावर विरोधकांचा पुन्हा बहिष्कार
विशेष प्रतिनिधी / मुंबई
भाजप,सेना आणि अजित पवार गटाचे हे सरकार अनैतिक आहे,त्यामुळे अशा सत्ताधारी लोकांसोबत बसण्याची सुद्धा लाज वाटते,असा प्रहार करत आम्ही त्यांच्या चहापान आयोजनावर बहिष्कार घालत असल्याचे विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
विधान भवनातील पत्रकार कक्षात बोलताना अंबादास दानवे ,काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण,एकनाथ खडसे,भाई जगताप,अभिजित वंजारी उपस्थित होते.
दोन पक्ष फोडण्याचे पाप या सरकारने करून लोक भावनेचा अनादर करून राज्याला लुटण्याचे काम सुरू केले आहे,सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून खाली अधिकारी यांचे ऐकत नाहीत म्हणून शासन आपल्या दारी असे सवंग उपक्रम घेतले जात आहेत,त्यात लोकांचा सहभाग दिसत असला तरी कामे होत नाहीत असाही आरोप दानवे यांनी केला.
विधानसभा विरोधीपक्ष नेता आमचाच होणार असून,कोण होईल हे वरिष्ठ नेते आणि सहकारी यांच्यात चर्चा होऊन ठरेल असे काँग्रेस गटनेते थोरात म्हणाले.