• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, April 13, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड ‘या’ दिवशी होणार, कार्यक्रम जाहीर

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 26, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.4k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडली असून त्यानंतर नव्याने निवडून आलेल्या सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवड करण्यासाठी कार्यक्रमाची घोषणा कधी होते याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले होते. ग्रामविकास विभागाने मंगळवारी जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून देखील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

त्यानुसार दिनांक १३ मार्च २०२६ रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम ११ (१) तसेच संबंधित नियमांनुसार ही निवडणूक जिल्हा परिषद सभागृहात दुपारी २.०० वाजता घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम ४५ (२) तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समितीच्या सभापती) व पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणुका) नियम १९६२ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडणार आहे. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे “सर्वसाधारण महिला” प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महिला सदस्यांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर उपाध्यक्ष पदासाठी देखील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांनी दिनांक १३ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या या विशेष बैठकीसाठी सर्व निर्वाचित सदस्यांना नियमानुसार नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीची कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार
दिनांक १३ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील. त्यानंतर दुपारी २.०० वाजता विशेष सभेस सुरुवात होईल.

नामनिर्देशनपत्रांची तपासणी व छाननी करण्यात येईल तसेच वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील. उमेदवारांना दुपारी २.१५ ते २.३० या वेळेत उमेदवारी मागे घेण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर अंतिम उमेदवारांची नावे घोषित करण्यात येतील. आवश्यक असल्यास प्रथम अध्यक्ष पदासाठी व त्यानंतर उपाध्यक्ष पदासाठी मतदान घेण्यात येईल. निवडणुकीचा निकाल तत्काळ जाहीर करण्यात येणार असून सभेचा इतिवृत्तांत त्याच दिवशी पूर्ण करून जिल्हा परिषद इतिवृत्त नोंदवहीमध्ये नोंदविण्यात येईल.

तसेच प्रमाणित प्रत शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीकडून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. अध्यक्ष पद महिला आरक्षित असल्याने महिला सदस्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली असून जिल्हा परिषद नेतृत्व कोणाकडे जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar
SendShareTweet
Previous Post

करजखेडा ग्रामपंचायतीत सव्वा चार लाखांचा अपहार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

टेलीग्रामवर जॉबची ऑफर देऊन बापलेकाची साडेचार लाखांची ऑनलाइन फसवणूक

Related Posts

रझाकारी मानसिकता..?, पोलिसांना पुढे करून शिंदे आता कार्यकर्त्यांनाच घाबरले

April 12, 2026

Breaking मेळाव्याआधीच शिवसेना पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात,एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात काय घडणार, जिल्ह्याचे लक्ष

April 12, 2026

सैन्य दलात २८ वर्षे सेवा; सुभेदार डोंगरे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक

April 11, 2026

मॉर्फ फोटोमुळे धाराशिवमध्ये राजकीय संभ्रम; पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा उधाण

April 11, 2026

आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्याला यश; अपर विभागीय आयुक्त कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

April 10, 2026

काँग्रेसमध्ये संघटन मजबुतीकरणाचा बिगुल; जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चेला वेग, तरुण चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता

April 10, 2026
Next Post

टेलीग्रामवर जॉबची ऑफर देऊन बापलेकाची साडेचार लाखांची ऑनलाइन फसवणूक

मध्य प्रदेशातील भाविकांच्या वाहनाला अपघात, महामार्गावरील चुकीच्या कामामुळे दुर्घटना

ताज्या घडामोडी

रझाकारी मानसिकता..?, पोलिसांना पुढे करून शिंदे आता कार्यकर्त्यांनाच घाबरले

April 12, 2026

Breaking मेळाव्याआधीच शिवसेना पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात,एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात काय घडणार, जिल्ह्याचे लक्ष

April 12, 2026

सैन्य दलात २८ वर्षे सेवा; सुभेदार डोंगरे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक

April 11, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group