• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, June 14, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव-तुळजापुरातील मोकाट जनावरांचा होणार बंदोबस्त; टेंडर निघाले, मोकाट श्वानांचे निर्बीजीकरण

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 6, 2024
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
955
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठीने उचलला होता मुद्दा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर पालिकेने काढले टेंडर, पुढच्या आठवड्यापासून अंमलबजावणी

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव शहरासह तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरात सर्वत्र मोकाट जनावरांचा आणि कुत्र्यांचा उच्छाद वाढल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील प्रत्येक चौकात मोकाट जनावरांनी ठिय्या मांडलेला असतो. या जनावरांमुळे अपघात देखील होत आहेत. ‘आरंभ मराठी’ने वर्तमानपत्रातून आणि यूट्यूब चॅनेलवरून धाराशिव तसेच तुळजापूर, उमरगा, कळंब येथील मोकाट जनावरांचा विषय लावून धरला होता. यावरून पालिकेच्या अकार्यक्षमतेवर देखील बोट ठेवले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी जिल्ह्यातील सर्वच नगर पालिकेला मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास सांगितले आहे. त्यामुळे धाराशिव तसेच तुळजापूर पालिकेने यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. पुढच्या आठवड्यापासून मोकाट जनावरे उचलून गो शाळेत पाठवली जाणार आहेत. तसेच अशा जनावरांना आणण्यासाठी गेल्यानंतर दंड भरावा लागणार आहे. सात दिवसानंतर ही जनावरे मालकांना परत दिली जाणार नाहीत.

रस्त्यांवर ठाण मांडून बसणाऱ्या मोकाट जनावरांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. ‘आरंभ मराठी’ने धाराशिव, कळंब,तुळजापूर आणि उमरगा या शहरातील मोकाट जनावरांच्या बातम्या ‘आरंभ मराठी’ने सचित्र प्रसिद्ध केल्या होत्या. याच बातमीचा परिणाम म्हणून धाराशिव नगरपालिकेने आता शहरातील मोकाट जनावरांचा आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. जनावरांचा आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेकडून टेंडर काढले असून खाजगी कंपनीलाच हे काम देण्यात येणार असल्याचे समजते.

कुत्र्यांचे निर्बीजीकरण, चार संस्थानी भरले टेंडर

यामध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुत्र्यांचे निर्बीजिकरण करण्यासाठी टेंडर काढण्यात आले आहेत. आतापर्यंत चार खाजगी कंपन्यांनी हे टेंडर भरले असून पालिकेकडून त्याची छाननी सुरू करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात चारमधून एका कंपनीची निवड पालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी सध्या ऑनलाइन टेंडर भरण्यास सुरुवात झालेली आहे. मंगळवारपर्यंत हे टेंडर भरून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर त्याची छाननी होणार आहे. यातील एका कंपनीची निवड केली जाणार आहे. मोकाट जनावरांच्या बाबतीत पालिकेकडून आता कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. पालिकेकडून टेंडर घेतलेल्या कंपनीला कोंडवाड्यासाठी शहरात जागा देण्यात येणार आहे. शहरातील सर्व मोकाट जनावरे पकडल्यानंतर सुरुवातीला पहिले सात दिवस शहरातच त्या जनावरांना ठेवण्यात येईल. सात दिवसात जर जनावराचे मालक जनावर घेऊन जाण्यासाठी आले तर मालकाला पाचशे ते हजार रुपयांपर्यंत रोख दंड आणि जनावरे संभाळण्यासाठी आलेला खर्च  त्या मालकाकडून वसूल करण्यात येणार आहे. सात दिवसानंतर ही जनावरे सोलापूर येथील गोशाळेत नेण्यात येतील.

पालिका ॲक्शन मोडवर

मोकाट कुत्री, जनावरे, डुक्कर यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिका आता ऍक्शन मोडवर येऊन काम करणार आहे. पुढील पंधरा दिवसात कंपन्यांची निवड करून ऑक्टोबर पासून कंपनी मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताचे काम करेल अशी अपेक्षा आहे. तुळजापूर शहरातील पालिकेने मोकाट जनावरे व मोकाट कुत्री यांचा बंदोबस्त करण्याचे काम एकाच कंपनीला दिल्याची माहिती मिळाली आहे. धाराशिवमध्ये मात्र यासाठी दोन वेगवेगळ्या कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे. आरंभ मराठीने सतत पाठपुरावा केलेल्या विषयाची पालिकेने गंभीर दखल घेतली आहे. येणाऱ्या काही दिवसात धाराशिव शहरातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

SendShareTweet
Previous Post

Big Breaking नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द; राज्य सरकारने अधिसूचना रद्द करण्याचा घेतला निर्णय

Next Post

छत्रपती संभाजी महाराज उपोषणकर्त्यांच्या भेटीला, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन

Related Posts

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

June 13, 2025

Dharashiv news महायुतीमध्ये वादाची ठिणगी; फडणवीसांना ‘बाप’ संबोधणाऱ्या राणेंना सद्बुद्धी यावी, शिवसेना जिल्हाप्रमुख साळुंके यांचा टोला

June 8, 2025

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एक आरोपी अटक, आतापर्यंत एकूण 37 आरोपी निष्पन्न

June 8, 2025

तिरंग्याला सलाम; ऑपरेशन सिन्दुरचा गौरव करत शिवसेनेच्या पुढाकारातून भव्य तिरंगा रॅली, महिला,विद्यार्थ्यांसह वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

May 22, 2025

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड

May 13, 2025

अंदाजपत्रकानुसारच निविदा मंजूर करा, अन्यथा फेरनिविदा काढा; धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्ते कामासंदर्भात शासनाच्या नगर विकास विभागाचे आदेश

May 3, 2025
Next Post

छत्रपती संभाजी महाराज उपोषणकर्त्यांच्या भेटीला, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन

Dharashiv News काल छ्त्रपती संभाजी महाराजांनी भेट घेतली; तरुणांनी 'या' अधिकाऱ्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत सहाव्या दिवशी सोडले उपोषण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

June 13, 2025

शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी आकाश कोकाटे यांची निवड; पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

June 12, 2025

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; मुंबईला विक्रीसाठी जाणारा आठ किलो गांजा पकडला

June 12, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group