• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, February 13, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपली; भाजपकडून स्वबळाची राजकीय खेळी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 21, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.6k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने धाराशिव तहसील कार्यालय परिसरात सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नेते आणि इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत युती–आघाडीबाबत स्पष्टता नसल्याने अनेक उमेदवारांमध्ये प्रचंड धाकधूक निर्माण झाली होती.

दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ असल्यामुळे बहुतांश पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली होती. युती व आघाडीच्या चर्चा अखेरपर्यंत सुरू असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी खबरदारी म्हणून एक अर्ज अपक्ष म्हणून, तर दुसरा अर्ज पक्षाकडून दाखल केला.

भारतीय जनता पार्टीकडून सर्व इच्छुक उमेदवारांना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे धाराशिव तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये भाजपकडून चार ते पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे चित्र आहे. भाजपने शेवटपर्यंत अधिकृत उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम ठेवला होता. अखेर दुपारी अडीच वाजता मल्हार पाटील हे पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म घेऊन तहसील कार्यालयात दाखल झाले. मात्र नेमका कोणत्या उमेदवाराला एबी फॉर्म मिळाला, याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.

काँग्रेस पक्षाकडूनही इच्छुक उमेदवारांना एक अपक्ष व एक पक्षाचा अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दुपारी सुमारे दोन वाजून पन्नास मिनिटांनी काँग्रेसचा पक्षनेता एबी फॉर्म घेऊन तहसील कार्यालयात दाखल झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मात्र एबी फॉर्म वाटपात फारसा गोंधळ न करता उमेदवारांना वेळेत फॉर्म देण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असली तरी महायुतीबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.

सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असतानाच धाराशिव तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून मात्र एकही प्रमुख नेता किंवा कार्यकर्ता उमेदवारी अर्ज दाखल करताना सक्रिय दिसून आला नाही. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत शिवसेनेची भूमिका संशयास्पद ठरली आहे. धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १२ गटांपैकी आणि पंचायत समितीच्या २४ गणांपैकी शिवसेना पक्षाकडून आतापर्यंत केवळ ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. अखेरच्या दिवशीही शिवसेनेकडून अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या अत्यल्प राहिल्याने तालुक्यातील शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दुसरीकडे भाजपकडून सर्व जागांवर स्वबळावर उमेदवार उभे करण्याची राजकीय खेळी दिसून येत आहे. त्यामुळे धाराशिव तालुक्यात भाजप व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोनच पक्ष सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे संकेत आहेत. कालपर्यंत, म्हणजे २० जानेवारीपर्यंत धाराशिव तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी ६७ तर पंचायत समितीसाठी ५२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र आज अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने ही संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे काही कार्यकर्ते आणि उमेदवार वेळ संपल्यानंतर गेटवरच अडकल्याचे चित्रही पाहायला मिळाले.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#nomination#papers#political#empowerment#BJP#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धांदल; आज धाराशिव तालुक्यातून ‘इतके’ अर्ज दाखल

Next Post

धाराशिव तालुक्यातून उमेदवारांची भाऊगर्दी; कोणत्या गटातून आणि गणातून ‘किती’ उमेदवारी अर्ज, वाचा सविस्तर

Related Posts

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

खाजगी सावकाराकडून आठवड्याला २० टक्के व्याजाची आकारणी; तरुणाला मारहाण करून मागितली तीन लाखांची खंडणी

February 11, 2026

रस्ते फोडण्याची घाई,कामाचा पत्ता नाही! धाराशिव शहरात चाललंय काय?

February 11, 2026

शिवसेनेचे सदस्य भाजपच्या गळाला; निकाल लागताच भाजपसह राष्ट्रवादी,सेनेचे सदस्य अज्ञातस्थळी

February 11, 2026
Next Post

धाराशिव तालुक्यातून उमेदवारांची भाऊगर्दी; कोणत्या गटातून आणि गणातून 'किती' उमेदवारी अर्ज, वाचा सविस्तर

चुकीला माफी नाही!, झेडपी, पंचायत समितीच्या अर्जांची छाननी सुरू; नवीन नियमानुसार छाननीत बाद झालेल्या अर्जाना अपील करता येणार नाही

ताज्या घडामोडी

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group