प्रतिनिधी / धाराशिव
धाराशिव नगर परिषदेअंतर्गत शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते करण्यात आला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून, नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे अशी माहिती जिल्हाप्रमुख साळुंके यांनी दिली आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक अंबादास दानवे, नागेश जगदाळे, किशोर पवार, विजय मुद्दे, नाना कळसकर, गणेश आसलेकर, सतीश कदम, अमित कदम, संजय (पप्पू) मुंडे, भीमा जाधव, पिंटू पवार, संतोष कुलकर्णी, सोनू कुलकर्णी, अॅड.अजित दानवे, सादिक तांबोळी, रोहन मुंडे, कुणाल धोत्रीकर, सुनील मोरे, प्रवीण चौधरी, शुभम पांढरे, शिवसेना शहर उपप्रमुख रजनीकांत माळाळे, शिवसेना शहर संघटक चौधरी, प्रणिल रणखांब, नितीन घोरपडे, ज्ञानेश्वर ठवरे, जावेद शेख यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.