• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, May 20, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिवच्या ‘या’ पाच मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली विशेष बैठक, प्रश्न कालमर्यादेत सोडविण्याच्या सूचना

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 9, 2024
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
2k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मागणीवरून मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकास प्रश्नांवर घेतली स्वतंत्र बैठक


आरंभ मराठी / धाराशिव
विकासाच्या योजनांचा पाठपुरावा सुरू असला तरी प्रशासकीय तसेच शासनाच्या पातळ्यांवर काही प्रश्न प्रलंबित असतात. ही बाब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडून खास धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख 5 प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी वरिष्ठ अधिका-यांची विशेष बैठक बैठक घेण्याची मागणी केली होती.त्यानुसार गुरूवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेण्यात आली.यावेळी जिल्ह्याला प्रगतीच्या मार्गावर नेणाऱ्या या कामांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यामध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासह तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास योजना, निम्न तेरणा प्रकल्प,कौडगाव एमआयडीसी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेच्या संदर्भात चर्चा झाली.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.मात्र काही कामांसाठी प्रशासकीय आणि शासनाच्या स्तरावर तांत्र‍िक अडचणी येत आहेत.या सगळ्या प्रश्नांची एकत्रितपणे सोडवणूक व्हावी, यासाठी आमदार राणा पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली होती.त्यानुसार गुरूवारी फडणवीस यांनी खास धाराशिव जिल्ह्यांच्या विकासावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, निम्न तेरणा उपसा सिंचन प्रकल्प, कौडगाव येथील एमआयडीसीच्या माध्यमातून उभारण्यात येणारा तांत्रिक वस्त्रनिर्मिती प्रकल्प, तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी लागणाऱ्या जागेची उपलब्धता या सर्व महत्त्वाच्या विषयावर सर्वंकष चर्चा झाली तसेच कामांचा निपटारा करण्यासाठी कालमर्यादा ठरवून देण्यात आली. झालेल्या निर्णयांची सक्त अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प टप्पा एक अंतर्गत चालू असलेले काम जुलै महिनाअखेर पूर्ण करणे अपेक्षित होते, मात्र तांत्रिक व भूसंपादनाच्या अडचणीमुळे 80 टक्के काम पूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. या अडचणी दूर करून डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्याचे देखील त्यांनी मान्य केले आहे.
निम्न तेरणा उपसा सिंचन योजना दुरुस्तीच्या कामास तांत्रिक मान्यता प्राप्त असून, पुढील आठवड्यात प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धतेाठी प्रस्ताव सादर करण्यास जलसंपदा तसेच वित्त व नियोजन विभागाच्या सचिवांना आदेशित करण्यात आले आहे. कौडगांव औद्योगिक वसाहतीमध्ये एमआयडीसीच्या माध्यमातून मंजूर तांत्रिक वस्त्रनिर्मिती प्रकल्पासाठी अँकर युनिट आणणे व तेथील पायाभूत सुविधांची कामे सुरू करण्याच्या सूचना एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या तर महाजनकोच्या कार्यकारी संचालकांना उंचवट्यावरील उपलब्ध जागेवर सौर उर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचे सुचित करण्यात आले आहे.या बैठकीसाठी अतिरिक्त मुख्य सचिव नियोजन राजगोपाल देवरा, प्रधान सचिव जलसंपदा दीपक कपूर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव गणेश पाटील, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, महाजनकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, कृष्णा खोऱ्याचे कार्यकारी संचालक श्री.त्रिमनवार,धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
–
तीर्थक्षेत्र विकास आराखडा उच्चाधिकार समितीकडे सादर करा, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
तुळजाभवानी विकास आराखड्याबाबत पुढील आठवड्यात उच्चाधिकार समितीच्या निर्णयासाठी प्रस्ताव सादर करण्याचे ठरले असून, जिल्हाधिकारी यांना तातडीने सदरील प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीतील निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी आवश्यक जलसंपदा व कौशल्य विकास विभागाची 12 हेक्टर जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करून घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घेण्याचे जिल्हाधिकारी यांना आदेशित करण्यात आले आहे.
–
विकासाला गती मिळेल,
सिंचन प्रकल्पासह जिल्ह्याच्या अत्यंत महत्वाच्या विषयावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक घेतली. त्यांनी कालबध्द कार्यक्रम आखून अंमलबजावणीच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनासाठी पाणी, युवकांना रोजगार व पर्यटनाच्या माध्यमातून अर्थकारणाला मोठी गती मिळेल, असा विश्वास आहे.
-राणाजगजितसिंह पाटील,आमदार, तुळजापूर

Tags: #commaharashtra #devendraphadanvis#ajitdadapawar #osmanabad #dharashiv
SendShareTweet
Previous Post

Raj Thackeray एकीकडे संवाद, दुसरीकडे पोलिस कारवाई; राज ठाकरेंना जाब विचारणाऱ्या 11 मराठा तरुणांवर गुन्हा दाखल

Next Post

शहरात वास्तव्य करून डाव साधला; वयोवृद्ध जोडप्यांना लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांचे अभिनंदन

Related Posts

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड

May 13, 2025

अंदाजपत्रकानुसारच निविदा मंजूर करा, अन्यथा फेरनिविदा काढा; धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्ते कामासंदर्भात शासनाच्या नगर विकास विभागाचे आदेश

May 3, 2025

आरोग्य सेवा सलाईनवर; 3 महिन्यांपासून पगार नसल्याने जिल्ह्यातील 970 आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, रुग्णांचे हाल

April 29, 2025

Tuljapur Drugs तुळजापूर श्रद्धेचं, भक्तीचं, अस्मितेचं प्रतीक..ड्रग्स प्रकरणात सत्य शोधा, बदनामी नको; तुळजापूरच्या कन्येचं माध्यमांना आवाहन

April 12, 2025

Devendra fadanvis देवेंद्रजी, वाट कसली पाहताय, कुलस्वामिनीच्या दरबारातून आजच घोषणा करून टाका; आमदार कैलास पाटील यांनी केले मुख्यमंत्र्यांना ‘हे’ आवाहन

March 29, 2025

कसली ही थट्टा..? 500 बेडचे रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर आणि न्यायालयाच्या इमारतीसाठी प्रत्येकी एक हजाराची तरतूद

March 16, 2025
Next Post

शहरात वास्तव्य करून डाव साधला; वयोवृद्ध जोडप्यांना लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांचे अभिनंदन

यलगट्टेंना भारी ठरल्या फड बाई; कामे न करताच कामांची बिले काढली, शासनाने मागवला अहवाल, जिल्हाधिकाऱ्यांना सचिवांचे पत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

10 हजारापर्यंत देणगी देणाऱ्या भाविकांच्या कुटुंबीयांना निःशुल्क दर्शन, विश्वस्तांच्या शिफारसीवर आलेल्या भाविकांना 200 रुपये शुल्क

May 19, 2025

तुळजापुरमध्ये ड्रग्ज नंतर मटक्याचा सुळसुळाट

May 18, 2025

धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.

May 18, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group