• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, June 8, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

छाननीनंतर ‘इतके’ अर्ज अवैध ठरले, ‘या’ तालुक्यातील एकही अर्ज अवैध नाही, छाननी प्रक्रियेची बातमी सविस्तर वाचा

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 23, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
733
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी गुरुवारी (दि. २२ जानेवारी) उशिरापर्यंत सुरू होती. जिल्ह्यातील सर्वच गट व पंचायत समितीच्या सर्व गणांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे प्रत्येक तालुक्यात छाननी प्रक्रिया वेळखाऊ ठरली.

धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण ५५ गटांसाठी ९६७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यावर्षी बहुतेक उमेदवारांनी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांची विशेष दक्षता घेतली असली, तरी छाननी प्रक्रियेदरम्यान २७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. तसेच २ उमेदवारांचे अर्ज हरकतीच्या सुनावणीसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. छाननीनंतर जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी सध्या ९६८ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तालुकानिहाय पाहता, धाराशिव तालुक्यात सर्वाधिक १७ उमेदवारी अर्ज अवैध ठरले.

त्यानंतर कळंब व भूम तालुक्यात प्रत्येकी ४ अर्ज बाद झाले, तर उमरगा आणि तुळजापूर तालुक्यात प्रत्येकी १ अर्ज अवैध ठरवण्यात आला. परंडा, वाशी आणि लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकही उमेदवारी अर्जाला छाननीत आक्षेप नोंदवण्यात आलेला नाही, ही बाब विशेष ठरली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील ८ पंचायत समितींच्या एकूण ११० गणांसाठी १,३६० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननी प्रक्रियेत ३८ अर्ज अवैध ठरवण्यात आले असून, १ अर्ज हरकतीच्या मुदतीवर राखून ठेवण्यात आला आहे. पंचायत समिती छाननीतही धाराशिव तालुक्यात सर्वाधिक १९ अर्ज अवैध ठरले.

त्याखालोखाल तुळजापूर तालुक्यात ७, तर उमरगा व भूम तालुक्यात प्रत्येकी ३ अर्ज अवैध ठरवण्यात आले. वाशी, लोहारा आणि कळंब तालुक्यात प्रत्येकी २ अर्ज अवैध झाले, तर परंडा तालुक्यात पंचायत समितीसाठी एकही अर्ज अवैध ठरवण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे परंडा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दाखल झालेले सर्वच उमेदवारी अर्ज छाननीत वैध ठरले आहेत.

आजपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दिनांक २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. मात्र २५ जानेवारी (रविवार) आणि २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) या दोन दिवसांमध्ये शासकीय सुट्टी असल्यामुळे या कालावधीत अर्ज मागे घेता येणार नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात उमेदवारांकडे केवळ तीनच दिवस उपलब्ध असणार आहेत.

या मर्यादित कालावधीत युती, आघाडी तसेच स्थानिक पातळीवरील राजकीय चर्चा व तडजोडींना वेग येण्याची शक्यता आहे. २७ जानेवारी रोजीच दुपारी साडेतीन वाजता निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक विभागाकडून प्रसिद्ध केली जाणार असून, त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

हायवेवर लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत आरोपींना ठोकल्या बेड्या

Next Post

धाराशिव तालुक्यातून उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सुरुवात; पहिल्याच दिवशी ‘या’ १२ उमेदवारांची माघार

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

धाराशिव तालुक्यातून उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सुरुवात; पहिल्याच दिवशी 'या' १२ उमेदवारांची माघार

भाजपमधूनही शिवसेना उबाठा गटात इनकमिंग, आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

ताज्या घडामोडी

पहिल्याच पावसात दाणादाण; पुलाजवळील पर्यायी रस्ता वाहून गेला, लातूर–कळंब वाहतूक खंडित

June 8, 2026

जंतर-मंतर पुन्हा गाजले; अण्णांनंतर महाराष्ट्रातून अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा

June 7, 2026

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group