• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, October 8, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 8, 2026
in राजकारण
0
कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती
0
SHARES
6
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / ढोकी

ऊसदराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच कसबे तडवळे येथील एस. पी. शुगरचे सुरेश पाटील यांनी बुधवारी मध्यरात्री ढोकीजवळ रास्ता रोको आंदोलन केले. अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे लातूर-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या प्रवासी बससह अन्य वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

तेरणा पट्ट्यात सध्या ऊसदराच्या मागणीवरून शेतकरी आंदोलन तीव्र झाले आहे. कारखान्यांकडे जाणाऱ्या ऊसाच्या वाहनांना अडवून कारखाने सुरू न करू देण्याची भूमिका शेतकरी संघर्ष समितीने घेतली आहे. बुधवारी रात्री ढोकी येथे ऊसाची वाहने अडविल्यानंतर सुरेश पाटील तेथे पोहोचले. यावेळी शेतकरी आणि त्यांच्यात वाद झाला. त्यांनी शेतकऱ्यांना धमकावल्याने वाद चिघळला. शेतकऱ्यांनी त्यांना तेथून परत पाठविल्यानंतर पाटील तडवळे येथे गेले.

आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप करीत त्यांनी गावकऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर कारखान्यातील कामगारांना सोबत घेऊन त्यांनी रात्री सुमारे अकराच्या सुमारास ढोकीजवळील धाराशिव फाटा त्रिकोण चौकात रास्ता रोको सुरू केला. सुमारे दीड तास हे आंदोलन सुरू होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

दरम्यान, तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी ढोकी परिसरातील बंदोबस्त वाढविला होता.
_

शेतकरी-कारखानदार आमनेसामने

ऊसदराच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासन, कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. मात्र, या बैठकीत दराबाबत तोडगा निघाला नाही. मागणी मान्य होईपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. दुसरीकडे कारखाना सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर काही कारखानदार ठाम असल्याने तेरणा पट्ट्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
_

पाटील, भाव द्या नाहीतर संयम ठेवा, संघर्ष कशासाठी ?

शेतकऱ्यांनी ऊसाला प्रतिटन पाच हजार रुपये दराची मागणी केली आहे. दराबाबत चर्चा सुरू असतानाच ऊस वाहतूक रोखणे स्वभाविक आहे. पण त्याला विरोध म्हणून कारखानदारांकडून रास्ता रोको होणे, हे आश्चर्यकारक आहे.
यामुळे प्रश्न चर्चेऐवजी थेट संघर्षाच्या दिशेने जात असल्याचे चित्र आहे.त्यामुळे सुरेश पाटील यांनी भाव द्यावा किंवा संयम बाळगावा.

SendShareTweet
Previous Post

नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे निधन गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका; वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास

Related Posts

तानाजीराव–शिवाजीराव पुन्हा एकत्र; सावंत कुटुंबातील राजकीय वादाला पूर्णविराम, आता धनंजय सावंत यांच्या भूमिकेकडे लक्ष

तानाजीराव–शिवाजीराव पुन्हा एकत्र; सावंत कुटुंबातील राजकीय वादाला पूर्णविराम, आता धनंजय सावंत यांच्या भूमिकेकडे लक्ष

October 7, 2026
ज्यांच्याविरोधात मतं मागितली, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ; सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीवरून धाराशिवमध्ये भाजपची नाराजी

ज्यांच्याविरोधात मतं मागितली, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ; सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीवरून धाराशिवमध्ये भाजपची नाराजी

October 5, 2026
..अखेर उपनगराध्यक्ष ढोबळेंचा राजीनामा, आता कुणाला संधी..?    पालिकेतील घडामोडींकडे शहराचे लक्ष, हे आहेत इच्छुक चेहरे

..अखेर उपनगराध्यक्ष ढोबळेंचा राजीनामा, आता कुणाला संधी..? पालिकेतील घडामोडींकडे शहराचे लक्ष, हे आहेत इच्छुक चेहरे

September 25, 2026
दोरखंड लावून शिवसेनेच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले

दोरखंड लावून शिवसेनेच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले

September 23, 2026
शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर

शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर

September 22, 2026
मराठा सेवकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरनाईकांच्या ध्वजारोहणाला कडेकोट सुरक्षा  पालकमंत्र्यांचा मुक्कामही सोलापूरला

मराठा सेवकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरनाईकांच्या ध्वजारोहणाला कडेकोट सुरक्षा पालकमंत्र्यांचा मुक्कामही सोलापूरला

September 16, 2026

ताज्या घडामोडी

कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

October 8, 2026
नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे निधन  गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका; वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास

नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे निधन गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका; वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास

October 8, 2026
तानाजीराव–शिवाजीराव पुन्हा एकत्र; सावंत कुटुंबातील राजकीय वादाला पूर्णविराम, आता धनंजय सावंत यांच्या भूमिकेकडे लक्ष

तानाजीराव–शिवाजीराव पुन्हा एकत्र; सावंत कुटुंबातील राजकीय वादाला पूर्णविराम, आता धनंजय सावंत यांच्या भूमिकेकडे लक्ष

October 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group