• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, July 5, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

घराच्या गच्चीवर फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा; महाबळेश्वरपेक्षा ८ अंशाने तापमान अधिक असूनही प्रयोग यशस्वी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 13, 2023
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
231
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

–अनंत साळी, जालना

स्ट्रॉबेरी म्हणजे थंड वातावरणातील पीक, त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी या पिकाच्या मागे लागत नाही.आपल्याकडे वातावरणच नाही मग कशाला प्रयोग करायचा, हा विचार. पण जालन्यातील एका तरुणाने मात्र या विचाराला छेद दिला. महाबळेश्वरसारख्या थंड ठिकाणी येणार स्ट्रॉबरीचं पीक जालना शहराच्या औदयोगिक वसाहतीतील घराच्या गच्चीवर घेण्याचा यशस्वी प्रयोग महेशनं केला आणि तो यशस्वी झाला.


पंचविशीतला महेश गायकवाड,जालना (jalna)शहराच्या भर औद्योगिक वसाहतीत राहणारा, कॉम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणारा जिज्ञासू तरुण. घराच्या आजूबाजूला स्टील कंपन्या असल्याने वातावरणाचा विचार न केलेलाच बरा. महेशला फळबागांची आवड आहे. बाजारात दिसणारी वेगवेगळी फळं आपल्याकडे कशी घेता येतील,याचा विचार तो करत असतो. त्याविषयी समाजमाध्यमातून माहिती घेतो. त्यातूनच स्ट्रॉबेरी पीक घेण्याचं त्यानं मनावर घेतलं. मुख्य आव्हान तापमानाचं होतं . जालन्याचं तापमान महाबळेश्वरपेक्षा ७-८ अंश सेल्सिअस जास्त आहे. पण हलक्या जमिनीत कमी पाण्यात येणाऱ्या या पिकाची निवड करून महेशनं स्ट्रॉबेरीच्या झाडांचा मळा फुलवला. तोही पूर्णपणे सैंद्रीय पद्धतीनं.
सप्टेंबर महिन्यात महेशनं महाबळेश्वरवरून स्ट्रॉबेरीची ४०० मायक्रो रोपे मागवली. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्यानं आपल्या घरावरील ६०० स्क्वेअर फुटांच्या गच्चीवर घराच्या गच्चीवर प्लास्टिक पिशव्यांमध्ये लागवड केली. विंटर डॉन जातीच्या या स्ट्रॉबेरीच्या जातीची रोपं आणताना मूळ मातीतले जीवाणू महेशनं जपले. सैंद्रीय खताचाच वापर. किडीपासून संरक्षणासाठी निंबोळी पेंडी. ठिबकच्या साहाय्यानं रोपांच्या भोवती ओलसरपणा टिकवून ठेवत तापमानाच्या आव्हानावर तोडगा काढला.
लागवडीच्या ३ आठवड्यानंतर रोपांना फुलं आली. पुढील ६ आठवड्यांनी स्ट्रॉबेरीची फळं यायला लागली आणि औद्योगिक वसाहतीत स्ट्रॉबेरी बहरू शकते हा महेशचा प्रयोग यशस्वी झाला. महेशच्या घराच्या गच्चीवर रसाळ, मधुर,लाल चुटुक स्ट्रॉबेरी बहरली. यासाठी त्याला खर्च आला २१ हजारांचा. त्याच्या या बागेला भेट देण्यासाठी जिल्ह्यातील लोक उत्सुकतेनं येत आहेत. महेशचा मित्र करण सांगतो, ”महेशनं अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. शेती नसताना त्यानं टेरेसवर स्ट्राबेरी घेतली. माझ्याकडे तर शेती आहे, त्यामुळे महेशकडून रोपं घेऊन त्याची लागवड करत असल्याचं करण सांगतो. त्याच्याकडून रोपं विकत घेणाऱ्यांना तो संपूर्ण मार्गदर्शन करत आहे.
महेश सांगतो, ”वातावरण आणि पीक हे गणित आपल्या डोक्यात पक्कं बसलेले असतं. त्यामुळे प्रयोगशीलतेची वाट आपण धरत नाही. त्यामुळे अनेक चांगली पिकं घेण्यापासून आपण वंचित राहतो.”(नवी उमेद navi umed)

Tags: strobary-jalna-maharashtra
SendShareTweet
Previous Post

600 रुपये दराने एका वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार !

Next Post

केंद्राकडून महाराष्ट्राला आपत्ती निवारणासाठी सर्वाधिक 1420 कोटींचा निधी; ओला दुष्काळ, नुकसान भरपाईसाठी नियोजन

Related Posts

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

June 13, 2025

Dharashiv news महायुतीमध्ये वादाची ठिणगी; फडणवीसांना ‘बाप’ संबोधणाऱ्या राणेंना सद्बुद्धी यावी, शिवसेना जिल्हाप्रमुख साळुंके यांचा टोला

June 8, 2025

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एक आरोपी अटक, आतापर्यंत एकूण 37 आरोपी निष्पन्न

June 8, 2025

तिरंग्याला सलाम; ऑपरेशन सिन्दुरचा गौरव करत शिवसेनेच्या पुढाकारातून भव्य तिरंगा रॅली, महिला,विद्यार्थ्यांसह वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

May 22, 2025

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड

May 13, 2025
Next Post

केंद्राकडून महाराष्ट्राला आपत्ती निवारणासाठी सर्वाधिक 1420 कोटींचा निधी; ओला दुष्काळ, नुकसान भरपाईसाठी नियोजन

डॉक्टरांसह रुग्णवाहिका चालकामुळे वाचले दोन नवजात बालकाचे प्राण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

भावी सरपंचाच्या स्वप्नांना ब्रेक ; ६२१ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत पुन्हा होणार

July 5, 2025

मोबाईलवर गेम खेळू नको म्हणताच 16 वर्षीय मुलीने घेतला गळफास

July 3, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group