• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, July 5, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव बसस्थानकात NCMC कार्डसाठी गोंधळ; सेवा अचानक बंद केल्याने प्रवाशांचे हाल

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 6, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
285
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सवलतीच्या प्रवासासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) स्मार्ट कार्ड काढणे बंधनकारक केल्यामुळे धाराशिव येथील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून मोठी गर्दी होत आहे. महिला, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी या सवलतधारक प्रवाशांना कार्ड काढणे आवश्यक असल्याने बसस्थानकात मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. याच गर्दीचा फायदा घेत काही एजंटांनी प्रवाशांची लूट सुरू केल्याचे समोर आले होते.

अधिकृतरित्या १९९ रुपयांत मिळणारे NCMC कार्ड २५० ते ३०० रुपयांपर्यंत विकले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या. धाराशिव जिल्ह्यातील NCMC कार्ड वितरणाचे टेंडर बार्शी येथील एका व्यक्तीला देण्यात आले असून, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एजंटमार्फत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, केवळ पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत सुमारे २०० रुपयांत मिळणारे हे कार्ड अचानक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दराने दिले जाऊ लागले.

धाराशिव बसस्थानकात २५० रुपये, तुळजापूर येथे २५० रुपये, तर कळंब येथे २३० रुपये असे दर आकारले जात होते. काही ठिकाणी तर खासगी जागेवरून कार्ड देताना ३०० रुपयांपर्यंत रक्कम उकळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकाराविरोधात काही प्रवाशांनी माध्यमांद्वारे आवाज उठवल्यानंतर बसस्थानकातील एजंटांनी मागील चार दिवसांपासून कार्ड काढण्याची सेवा पूर्णपणे बंद केली आहे.

त्यामुळे आता उलट परिस्थिती निर्माण झाली असून, कार्ड काढण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या बसस्थानकातील काउंटरबाहेर महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी होत असून, सेवा बंद असल्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांचे विशेष हाल होत आहेत. कार्ड सेवा का बंद आहे, ती पुन्हा कधी सुरू होणार याबाबत कोणतीही अधिकृत सूचना बसस्थानकात लावण्यात आलेली नाही.

विशेष म्हणजे, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडेच परिवहन खात्याचा कारभार असताना त्यांच्या जिल्ह्यातच NCMC कार्ड प्रक्रियेत गोंधळ व गैरव्यवहार होत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, ही सेवा तातडीने सुरू करून निश्चित दरात पारदर्शक पद्धतीने कार्ड वितरण करावे, तसेच जास्त पैसे घेणाऱ्या एजंट वर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #Confusion#NCMCCard#Dharashiv#BusStand#services
SendShareTweet
Previous Post

आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडून बळीराजाला दिलासा; ८० लाखांच्या स्वखर्चातून करणार १६० शेतरस्ते

Next Post

भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात; प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात; प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प

शक्तिपीठ महामार्गाचे सुधारित रेखांकन जाहीर; धाराशिवमध्ये काय बदल झाला वाचा सविस्तर

ताज्या घडामोडी

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

June 28, 2026
वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला;   उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला; उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

June 28, 2026
पंधरा वर्षे एका सापाला दूध पाजले; संजय राऊत यांची ओमराजे यांच्यावर जहरी टीका

पंधरा वर्षे एका सापाला दूध पाजले; संजय राऊत यांची ओमराजे यांच्यावर जहरी टीका

June 29, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group