• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, March 21, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

दैनिक आरंभ मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या स्नेह मेळावा

Aarambha Marathi by Aarambha Marathi
March 21, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

अल्पावधीत सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या दैनिक आरंभ मराठीच्या द्वितीय वर्धापन दिनाचा आरंभ स्नेह मेळावा शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला आहे. रविवार, २२ मार्च रोजी सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत हा मेळावा होणार असून, या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

२६ जानेवारी २०२४ रोजी दैनिक आरंभ मराठी या वृत्तपत्राची धाराशिवमध्ये सुरुवात झाली. विश्वासार्ह बातम्या, निःपक्ष आणि निर्भीड भूमिका मांडत आरंभ मराठीने केवळ जिल्ह्यातच नव्हे तर सोलापूर,कोल्हापूर,सांगली, पुणे,लातूर जिल्ह्यात देखील आपला वाचकवर्ग निर्माण केला.
आरंभ मराठीने सातत्याने सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेतली. त्यामुळे सरकारी पातळीवर रखडलेल्या काही योजना मार्गी लागल्या आणि थेट नागरिकांशी संबंधित रस्ते,पाणी, सुरक्षा आदी प्रश्नांना उत्तर मिळाले.

महिलांच्या संदर्भातील अडचणी आरंभ मराठीने सातत्याने मांडल्या.धाराशिव शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह, टवाळखोराकडून होणारी छेडछाड, कौटुंबिक हिंसाचार अशा अनेक समस्या मांडताना त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असला तरी इथली व्यवस्था ही त्याच्याकडे कायम दुर्लक्ष करत आहे. या व्यवस्थेला भानावर आणण्यासाठी शेतमालाचे भाव, शेतकऱ्यांची होणारी गळचेपी,पीकविमा, अनुदान या नेहमीच्या समस्यांसह अतिवृष्टीने होत असलेले नुकसान आणि न मिळणारी भरपाई यासाठी आरंभ मराठीने अनेकवेळा वृत्तमालिका चालवली, तज्ञ मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या.
दरम्यान,शासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना देखील जरब बसावी, प्रशासकीय कार्यालयामध्ये होणारी अडवणूक थांबावी यासाठी देखील आरंभ मराठी कायम सतर्क असते.

शहरी भागात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आरंभ मराठीने अभियान राबवले.त्यातून नागरिकांच्या समस्या समोर आल्या आणि त्याचे निराकरणही झाले. आरंभ मराठीचा दोन वर्षांचा हा प्रवास तसा मोठा पल्ला नाही.पण इतक्या कमी कालावधीत दैनिकाने लक्षावधी वाचकांची पसंती मिळवली हे उल्लेखनीय आहे.

अवघ्या एकाच वर्षात आरंभने जिल्ह्याबाहेर पदार्पण केले.
आरंभ मराठीच्या या दैदिप्यमान वाटचालीमध्ये अर्थातच असंख्य वाचक,जाहिरातदार आणि लाखो हितचिंतकांच्या सदिच्छा,शुभेच्छा सोबत आहेत.त्याशिवाय हा प्रवास सोपा नाही. म्हणूनच आरंभ मराठी परिवारावर प्रेम करणाऱ्या तमाम वाचक, जाहिरातदारांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आरंभ स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला असून, श्रीपतराव भोसले हायस्कूल (जुनी इमारत) येथे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरंभ परिवाराचा भाग बनावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: #tomorrow#DainikAarambhMarathi
SendShareTweet
Previous Post

धाराशिवमध्ये गूढ स्फोटासारखा आवाज; भूकंप झाल्याच्या चर्चा

Related Posts

धाराशिवमध्ये गूढ स्फोटासारखा आवाज; भूकंप झाल्याच्या चर्चा

March 20, 2026

2020 च्या पीक विमा प्रकरणात पुन्हा ‘तारीख पे तारीख’ आता 23 मार्च रोजी पुढील सुनावणी

March 17, 2026

गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर एजन्सींना ‘या’ सूचना; अन्यथा कारवाईचा इशारा

March 16, 2026

४० वर्षांच्या मागणीला यश; अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जागा मिळवून दिल्याबद्दल नगर पालिकेत मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री, आमदार राणा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव

March 16, 2026

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील; उपाध्यक्षा उषाताई गायकवाड

March 13, 2026

अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी महायुतीकडून अर्चनाताई पाटील व उषाताई गायकवाड रिंगणात; महाविकास आघाडी देखील मैदानात

March 13, 2026

ताज्या घडामोडी

दैनिक आरंभ मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या स्नेह मेळावा

March 21, 2026

धाराशिवमध्ये गूढ स्फोटासारखा आवाज; भूकंप झाल्याच्या चर्चा

March 20, 2026

2020 च्या पीक विमा प्रकरणात पुन्हा ‘तारीख पे तारीख’ आता 23 मार्च रोजी पुढील सुनावणी

March 17, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group