• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, September 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

मराठा सेवकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरनाईकांच्या ध्वजारोहणाला कडेकोट सुरक्षा पालकमंत्र्यांचा मुक्कामही सोलापूरला

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 16, 2026
in राजकारण
0
मराठा सेवकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरनाईकांच्या ध्वजारोहणाला कडेकोट सुरक्षा  पालकमंत्र्यांचा मुक्कामही सोलापूरला
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७८वा वर्धापन दिन उद्या धाराशिव येथे साजरा करण्यात येणार असून, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण होणार आहे. मात्र, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्य सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत धाराशिवमधील मराठा सेवकांनी पालकमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध दर्शविला आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण न करता ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण करावे, अशी मागणी करणारे निवेदनही प्रशासनाला देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उद्याच्या कार्यक्रमासाठी सुरक्षा व्यवस्था वाढविली असून, ओळखपत्र तपासल्यानंतरच नागरिकांना कार्यक्रमस्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असून, सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्याने त्यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

१५ सप्टेंबरपासून मुंबईच्या दिशेने प्रयाण करून १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर धाराशिवमधील मराठा सेवकांनी पालकमंत्री सरनाईक यांच्या दौऱ्याला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. प्रशासनाकडून पालकमंत्र्यांच्या दौऱ्याची विशेष खबरदारी घेतली जात आहे. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार असून, कार्यक्रमस्थळी प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळखपत्राद्वारे तपासणी केली जाणार आहे. ओळखपत्राशिवाय कोणत्याही व्यक्तीला ध्वजारोहणाच्या कार्यक्रमस्थळी प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांचा अधिकृत दौरा प्रशासनाला कळविला असला तरी, त्यामध्ये धाराशिवमधील नियोजित कार्यक्रमांचा सविस्तर उल्लेख करण्यात आलेला नाही.

सरनाईक आज सायंकाळी पाच वाजता ठाणे येथून मोटारीने सोलापूरकडे रवाना झाले असून, रात्री बारा वाजता सोलापूर येथे पोहोचण्याचे नियोजन आहे. त्यांचा रात्रीचा मुक्काम सोलापूर येथे राहणार असून, गुरुवारी सकाळी ते सोलापूरहून धाराशिवकडे रवाना होऊन ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासोबतच उद्या जिल्हा नियोजन समितीची बैठकही आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. एकीकडे शासकीय कार्यक्रम आणि जिल्हा नियोजन समितीची बैठक, तर दुसरीकडे मराठा सेवकांनी घेतलेली विरोधाची भूमिका यामुळे प्रशासनाकडून कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांनी शांतता राखून शासकीय कार्यक्रमात सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

SendShareTweet
Previous Post

‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

Related Posts

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

August 27, 2026
धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात,   भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात, भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

August 19, 2026
खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

August 15, 2026
भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

August 3, 2026
भाजपमधील गटबाजी; पुन्हा एकदा राणा पाटलांना वगळले, बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमंत्रण पत्रिकेतून नाव गायब

भाजपमधील गटबाजी; पुन्हा एकदा राणा पाटलांना वगळले, बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमंत्रण पत्रिकेतून नाव गायब

August 1, 2026

ताज्या घडामोडी

मराठा सेवकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरनाईकांच्या ध्वजारोहणाला कडेकोट सुरक्षा  पालकमंत्र्यांचा मुक्कामही सोलापूरला

मराठा सेवकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरनाईकांच्या ध्वजारोहणाला कडेकोट सुरक्षा पालकमंत्र्यांचा मुक्कामही सोलापूरला

September 16, 2026
‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

September 16, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

September 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group