• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, April 27, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील; उपाध्यक्षा उषाताई गायकवाड

Aarambha Marathi by Aarambha Marathi
March 13, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
731
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

महायुतीचा जल्लोष; जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा

आरंभ मराठी / धाराशिव

अत्यंत चुरशीच्या लढतीनंतर अखेर धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपने सत्ता काबीज करत इतिहास रचला आहे. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर शिवसेनेचे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषाताई गायकवाड यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निकालानंतर जिल्हा परिषद परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व फटाके फोडत जल्लोष साजरा केला.

गेल्या तब्बल ३२ दिवसांपासून जिल्हा परिषदेचे सदस्य जिल्ह्याबाहेर मुक्कामी होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होताच शुक्रवारी दुपारी सर्व सदस्य धाराशिवमध्ये दाखल झाले. निवडीपूर्वी महायुतीमध्येच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावरून चुरस निर्माण झाल्याने राजकीय वातावरण तापले होते. मात्र अखेर चर्चेनंतर महायुतीचा फॉर्म्युला ठरला आणि भाजपकडून अर्चनाताई पाटील यांचे नाव अंतिम करण्यात आले.
निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे अर्चनाताई पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली आणि त्याचवेळी उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उषाताई गायकवाड यांना संधी देण्यात आली.

या निकालामुळे जिल्ह्यातील सत्तासमीकरण स्पष्ट झाले असून, जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने ही लढत जिंकत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेत निर्णायक यश मिळवले.
अध्यक्ष पदासाठी झालेल्या मतदानात अर्चनाताई पाटील यांना ४५ मते, तर विरोधी उमेदवाराला ९ मते मिळाली.

उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या मतदानात उषाताई गायकवाड यांना ४५ मते, तर विरोधी उमेदवाराला १० मते मिळाली. महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या सदस्य लता मोरे या अध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सभागृहात पोहोचल्यामुळे त्यांना अध्यक्ष पदासाठी मतदान करता आले नाही; मात्र त्यांनी उपाध्यक्ष पदासाठी मतदान केले.

शिवसेना (उबाठा) पुरस्कृत लोणी गटातील विजयी उमेदवार राणी रेवण ढोरे यांचे एक मत महायुतीच्या बाजूने पडले असण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना (उबाठा) पक्षाचे सात सदस्य तसेच एक पुरस्कृत सदस्य आणि काँग्रेसचे तीन सदस्य असे महाविकास आघाडीकडे ११ मते असताना महाविकास आघाडीला फक्त १० मते मिळाली.

त्यामुळे एक मत फुटले आहे. निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेसमोर मोठा जल्लोष केला. गुलाल उधळत, फटाके फोडत आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला. धाराशिवच्या राजकारणात ही निवड ऐतिहासिक मानली जात आहे.

SendShareTweet
Previous Post

अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी महायुतीकडून अर्चनाताई पाटील व उषाताई गायकवाड रिंगणात; महाविकास आघाडी देखील मैदानात

Next Post

४० वर्षांच्या मागणीला यश; अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जागा मिळवून दिल्याबद्दल नगर पालिकेत मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री, आमदार राणा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव

Related Posts

अल्पवयीन मुलीवर दोघांकडून लैंगिक अत्याचार

April 27, 2026

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून 20 लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

April 27, 2026

माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळीच्या चोवीस तासात मुसक्या आवळल्या

April 26, 2026

बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या लॉजवर धाड; पोलिसांची मोठी कारवाई

April 25, 2026

अल्पवयीन बालिकेचा विवाह उधळला; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

April 22, 2026

देव कोपल्याच्या अंधश्रद्धेतून खंडणीचा गुन्हा; जात पंचायत बसवून महिलेस मारहाण, ६० हजारांची वसुली

April 21, 2026
Next Post

४० वर्षांच्या मागणीला यश; अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जागा मिळवून दिल्याबद्दल नगर पालिकेत मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री, आमदार राणा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव

गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर एजन्सींना 'या' सूचना; अन्यथा कारवाईचा इशारा

ताज्या घडामोडी

अल्पवयीन मुलीवर दोघांकडून लैंगिक अत्याचार

April 27, 2026

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून 20 लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

April 27, 2026

माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळीच्या चोवीस तासात मुसक्या आवळल्या

April 26, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group