• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, April 6, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजणार;  २० फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेला प्रारंभ

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 18, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
840
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपत आहे, तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग (वॉर्ड) रचनेचा अधिकृत कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग येणार असून, ग्रामपंचायत निवडणुकांची उलटगणती सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने १७ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात आदेश जारी केले असून, त्यानुसार २० फेब्रुवारी २०२६ पासून प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू होणार आहे. ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना ७ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार असून, अंतिम प्रभाग रचना ४ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

तीन टप्प्यांत पार पडणार प्रक्रिया –

प्रभाग रचनेची संपूर्ण प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार असून, त्याची जबाबदारी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात तहसीलदार गुगल अर्थच्या मदतीने २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत संबंधित गावांचे नकाशे अंतिम करतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तलाठी आणि ग्रामसेवक प्रत्यक्ष पाहणी करून २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रभाग निश्चित करतील. तिसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून संक्षिप्त तपासणी झाल्यानंतर २३ मार्च २०२६ पर्यंत प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येईल आणि आयोगाकडून त्यास मान्यता दिली जाईल.

हरकतींसाठी नागरिकांना संधी –

प्रभाग रचनेबाबत नागरिकांना आपली मते आणि हरकती नोंदवण्याची संधी देण्यात येणार आहे. ७ एप्रिल २०२६ रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केल्यानंतर १३ एप्रिल २०२६ पर्यंत हरकती नोंदवता येतील. प्राप्त हरकतींवर २१ एप्रिल २०२६ पर्यंत उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील. त्यानंतर जिल्हाधिकारी सर्व प्रस्तावांची पडताळणी करून २८ एप्रिल २०२६ पर्यंत अंतिम प्रभाग रचना निश्चित करतील आणि ती राज्य निवडणूक आयोगाला सादर करतील. आयोगाच्या मान्यतेनंतर ४ मे २०२६ रोजी अंतिम प्रभाग रचना अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

धाराशिव जिल्ह्यात ४२८ ग्रामपंचायतींवर प्रशासक –

धाराशिव जिल्ह्यातील तब्बल ४२८ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपलेली आहे. या ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक नेमण्यात आले आहेत. मात्र, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या स्थगिती आदेशामुळे सध्या ग्रामसेवकच ग्रामपंचायतींचा दैनंदिन कारभार पाहत आहेत.

जून-जुलैमध्ये निवडणुकांची शक्यता –

प्रभाग रचना पूर्ण झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. वेळापत्रकानुसार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जून किंवा जुलै २०२६ महिन्यात पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रक्रियेमुळे ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली असून, इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. आगामी काळात ग्रामपंचायत निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#GramPanchayat#elections#formation#starts#February#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा ‘गूढ आवाज’; सकाळी ८.०३ वाजता धरणी कंप झाल्याची चर्चा

Next Post

लोहटा पश्चिम शिवारात गुप्त अफू शेतीचा पर्दाफाश; साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशिव क्रिकेट संघाचा नांदेड संघावर दमदार विजय

April 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार महाराष्ट्र खो-खोच्या अध्यक्षपदी बिनविरोध; राज्याच्या खो-खो संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष

April 5, 2026

बातमी हटवण्यासाठी पत्रकाराला धमकी; पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल

April 5, 2026

2020 च्या पीक विमा प्रकरणात लोकप्रतिनिधी गप्प का? 134 कोटी रुपये कोणी अडवले?

April 5, 2026

तुळजापूर शहरात अनधिकृत बॅनरचा सुळसुळाट; शहराचे विद्रूपीकरण, अपघाताचा धोका वाढला

April 4, 2026

येरमाळा येडेश्वरी यात्रेत मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

April 4, 2026
Next Post

लोहटा पश्चिम शिवारात गुप्त अफू शेतीचा पर्दाफाश; साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

काम न करता सात लाखांचा अपहार; बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल

ताज्या घडामोडी

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशिव क्रिकेट संघाचा नांदेड संघावर दमदार विजय

April 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार महाराष्ट्र खो-खोच्या अध्यक्षपदी बिनविरोध; राज्याच्या खो-खो संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष

April 5, 2026

बातमी हटवण्यासाठी पत्रकाराला धमकी; पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल

April 5, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group